शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई; दोन दिवसांतून पाणी तेही गढूळ 

By अशोक डोंबाळे | Updated: February 26, 2024 15:43 IST

नागरिकांची खासगी जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी गर्दी

सांगली : कृष्णा नदीतच अपुरा पाणीसाठा असल्यामुळे सांगली शहराला अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सांगलीतील घन:शामनगर, विकासनगर, चिंतामणीनगर परिसराला तर गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा एक दिवसाआड एक दिवस पाणी येत आहे. दोन दिवसांतून मिळणारे पाणीही पुरेशा दाबाने होत नसल्यामुळे नागरिकांच्या घरावरील पाण्याच्या टाक्या रिकाम्याच राहिल्या आहेत. नागरिकांना गेल्या २० वर्षांत प्रथमच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.मार्च, एप्रिल महिन्यापूर्वीच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच सांगली शहराच्या उपनगरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सांगली शहरापासून जवळच असलेल्या घन:शामनगर, विकासनगर, वसंतदादा कारखाना परिसर, पंचशीलनगर, राजनगर, संजयनगर, चिंतामणीनगर, कलानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; पण तोही दूषित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. घरातील पाण्याच्या टाक्याही रिकाम्या झाल्यामुळे विकतचे पाणी नागरिकांना घ्यावे लागत आहे. पिण्यासाठी तर खासगी जलशुद्धीकरण केंद्रावरून नागरिक पाणी विकतचे घेत आहेत. तरीही या परिसरातील लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नागरिकांवर विकतचे पाणी पिण्याची वेळघन:शामनगर, चिंतामणीनगर, राजनगर, विकासनगर, पंचशीलनगर, वसंतदादा कारखाना परिसरात दोन दिवसांतून पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा गढूळ होत असल्यामुळे नागरिकांना खासगी जलशुद्धीकरण केंद्रावरुन पिण्यासाठी पाणी विकतचे आणावे लागत आहे. खासगी जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पाणीपुरवठा विभागाचा सावळा गोंधळघन:शामनगर, चिंतामणीनगर, राजनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पाणी टंचाईबद्दल विचारणा केली. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई असल्यामुळे एक दिवसाआड एक दिवस पाणीपुरवठा होत आहे. पाणी अशुद्ध पुरवठ्याबद्दल आम्हालाही काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.

खासदार, आमदारांचेही दुर्लक्षशहरातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असताना खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पाणी टंचाईवर काहीच उपाययोजना केल्या नाहीत, असाही नागरिकांमधून आरोप होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार की नाही, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी