लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील साळशिंगमळ्यात नागरिकांना पाण्याविना ६० वर्षे राहावे लागले होते. दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन करून नळ कनेक्शन दिले.
शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. येथील लोकांना पाणी अर्धा ते एक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत होते. अनेक जण जार विकत घेत होते. विहिरींना पिण्यायोग्य पाणी नव्हते
पिण्याची. सरपंच मोरे यांनी चार लाख रुपये खर्चून स्वखर्चाने पाइपलाइन सुमारे ७० कुटुंबांना नळ कनेक्शन दिले.
यावेळी विकास मोरे, साहेबराव पाटील, बाळासाहेब होनराव, सागर ढोले, मुन्ना तांबोळी, शेखर मिसाळ, संजय वाघमारे, श्रीरंग शिंदे, आबा सागर, सावंता पुसावळे आदी उपस्थित होते.