शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

करमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:30 IST

Shirla Dam Water Sangli :  शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.

ठळक मुद्देकरमजाई तलावातून सोडलेले पाणी पोहोचले.मानकरवाडी तलावात उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार

विकास शहाशिराळा  :  तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून ते मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.तालुक्यातील पावलेवाडी नं १ , पावलेवाडी नं २ , बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं १ , शिरशी नं १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी , पानुम्बरे तर्फ शिराळा नं २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १००%, चव्हाण वाडी नं.१ ,गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं २ , वाकुर्डे खुर्द या मध्ये (३०%), शिरसटवाडी , गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं २ या मध्ये (३५%) ,पाडळी , लादेवाडी या मध्ये (४०%) येळापूर ( चव्हानवाडी) , तडवळे ( वाडदरा) ( कुंदनाला) , निगडी (महारदरा), धामवडे ,वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द या मध्ये (४५%) मेणी ( संकुपीनाला) , अटूगडेवाडी (मेणी) , शिरशी ( कासारकी) करमाळा नं १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं १ पाडळीवाडी यामध्ये (५०%) भाटशिरगाव या मध्ये (५५%) खिरवडे , बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६०%) बादेवाडी ( वाकुर्डे बुद्रुक)या मध्ये ( ७०%) , भैरववाडी ,तडवळे नं१ या मध्ये (२०%) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर इंधन विहिरी ५३० असून यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितले प्रमाणे कार्यकारी अभियंता डी डी शिंदे , वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस देवकर , लालासाहेब मोरे , एस डी देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

 

एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा.१ मार्च पासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे.

-एस.डी देसाई,शाखा अभियंता , शिराळामोरणा प्रकल्प

 

  • करमजाई तलाव ९९ % ,
  • अंत्री बुद्रुक तलाव १३%
  • शिवणी तलाव १५%
  • टाकवे तलाव २४%
  • रेठरे धरण तलाव १%
  • कार्वे तलाव २०%
  • मोरणा मध्यम प्रकल्प २५% 
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीshirala-acशिराळा