शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पूर्वमध्ये पाण्याचे राजकारण पेटले

By admin | Updated: November 20, 2015 00:20 IST

विसापूर-पुणदी योजनेचे राजकारण : पाणी सोडण्यावरून पूर्व भागात संघर्षाची चिन्हे

प्रवीण पाटील -सावळज--तासगाव पूर्व भागासाठी असलेल्या बहुचर्चित विसापूर-पुणदी या उपसा जलसिंचन योजनेला आतापर्यंत जेवढे पाणी आले, त्याच्या किती तरी पटीने जास्त या योजनेचे राजकारण करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या प्रयत्नाने ही योजना झाली. मात्र योजनेच्या भूमिपूजनापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांजर्डे येथे पाणी परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला व पूर्व भागासाठी पाणी योजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आाला. त्यावेळी खा. संजयकाका पाटीलही राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे तालुक्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वाभिमानीच्या महेश खराडेंनी घेतली. त्यास शेतकऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. स्वाभिमानीच्या पाणी परिषदेनंतर आठच दिवसात राष्ट्रवादीने त्याच ठिकाणी जाहीर सभा घेऊन विसापूर-पुणदी योजनेचा व्यासपीठावरच नारळ फोडण्यात आला. अतिशय जलदगतीने या योजनेचे काम करुन आर. आर. पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचे उद्घाटन घेऊन, पूर्व भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढल्याचे जाहीर केले. या योजनेमधून सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीन वेळा भरण्याची तरतूद केल्याचे सांगण्यात आले व विधानसभा निवडणुकीला या योजनेचा पुरेपूर फायदा करुन घेण्यात आला.राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेल्यानंतर प्रारंभी विसापूर-पुणदी योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या खा. संजयकाकांनी नंतर ही योजना सुरु करुन या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परवाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बिरणवाडीमधून अग्रणी नदीमध्ये या योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले. यावरुन खासदार व आमदारांनी स्वतंत्ररित्या आमच्याच प्रयत्नाने हे पाणी सोडल्याचे सांगितले. यावरून आमदार व खासदारांमध्ये या पाण्यावरून चांगलाच श्रेयवाद रंगला.आतापर्यंत स्वाभिमानी, राष्ट्रवादी व भाजपने या योजनेचे राजकीय भांडवल करून त्याचा राजकारणासाठी पुरेपूर फायदा करुन घेतला. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कधी होणार? हा प्रश्नच आहे. सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीनदा भरण्याची तरतूद असूनही, ३०२ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या तलावामध्ये गेल्या एका वर्षात १० दशलक्ष घनफूटही या योजनेचे पाणी आले नाही, हे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. फक्त निवडणुकांच्या तोंडावर पाणी येते. त्यामुळे ते निवडणुकांसाठी आहे की शेतीसाठी? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खासदार-आमदारांनी श्रेयवाद थांबवून शेतकऱ्यांना पाणी देण्याची गरज आहे.पाण्यासाठी संघर्ष नको, समन्वय हवाविसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सावळज व वायफळे येथील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सिद्धेवाडी तलावामधील पेड प्रादेशिक व सावळजला पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. शिवाय या तलावात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या उर्वरित शेतीला तरी पाणी मिळावे, ही वायफळे येथील नेत्यांची अपेक्षा आहे. तसेच सावळजलाही शेती पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्याची तीव्र गरज आहे. त्यामुळे वायफळे व सावळज येथील नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संघर्ष न करता एकत्रितपणे समन्वयाने हा प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. खासदार, आमदारांनी श्रेयवाद थांबविण्याची गरजखासदार व आमदारांनी या योजनेचा श्रेयवाद थांबवावा व एकत्रितपणे टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना सातत्याने कशी सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, पूर्व भागातील आठ गावांच्या योजनेतील समावेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज असल्याची भावना पूर्व भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.