शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील बंद पडलेल्या ‘वॉन्लेस’ हॉस्पिटलला नवसंजीवनी, तमिळनाडूतील वेल्लोरच्या पथकाकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:51 IST

‘वैद्यकीय पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे.

मिरज : मिरजेतील बंद असलेल्या वॉन्लेस हॉस्पिटलचे वेल्लोर तमिळनाडू येथील ख्रिश्चन मेडिकल काॅलेजकडे हस्तांतरण होणार आहे. वेल्लोर येथील पथकाने मिरजेत येऊन वॉन्लेसची पाहणी केली. त्यामुळे वॉन्लेस हाॅस्पिटल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.मिरजेतील सुमारे १३० वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे रुग्णालयातील पाचशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे. गेले वर्षभर पगार मिळाला नसल्याने रुग्णालय कर्मचारी हवालदिल आहेत. थकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज व पाणीपुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल काॅलेज व हाॅस्पिटलकडे वाॅन्लेस रुग्णालयाच्या हस्तांतरणाबाबत चाचपणी सुरू आहे.‘वैद्यकीय पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये मिरजेत वॉन्लेस (मिशन) रुग्णालयाची स्थापना करून आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा प्रारंभ केला. डॉ. वॉन्लेस यांनी आपल्या उपचाराने हजारो रुग्णांवर उपचार केले. डॉ. वॉन्लेस यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, नटसम्राट बालगंधर्व यांच्यावरही उपचार केले होते.

१९६२ मध्ये मिशन रूग्णालयाच्या सहकार्याने मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवर लोक मिरजेला उपचारासाठी येत असल्याने मिशनचा राज्यात व देशातही लौकिक होता. मात्र गतवर्षापासून आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या ऐतिहासिक मिशन हॉस्पिटलचे अस्तित्व धोक्यात असल्याने तमिळनाडूतील ख्रिश्चन मेडिकल काॅलेज या संस्थेकडे मिशन हाॅस्पिटलचे हस्तांतरणाच्या हालचाली सुरु आहेत.यासाठी वेल्लोर येथील २० जणांच्या पथकाने मिरजेत मिशन रुग्णालयास भेट देऊन तीन दिवस पाहणी केली. हे पथक वेल्लोर येथील संचालक मंडळाला अहवाल देणार असून त्यानंतर वाॅन्लेस रुग्णालय वेल्लोरच्या अधिपत्याखाली पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे बंद असलेले मिशन रुग्णालय पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटल