शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election Voting: सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत ५७.८६ टक्के मतदान 

By अशोक डोंबाळे | Updated: December 2, 2025 12:44 IST

आष्टा नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त असल्याने नऊ पर्यंत मतदान ठप्प होते

सांगली: जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २४.७७ टक्के मतदान झाले आहे. शिराळा, विटा, उरुण-ईश्वरपूर, तासगाव यांसारख्या ठिकाणी मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगां लावलेल्या आहेत. उर्वरित ठिकाणीही मतदानाचा वेग वाढत आहे. दुपारी ३.३० पर्यंत ५७.८६ टक्के मतदान झाले.जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या सहा नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी या दोन नगरपंचायतीसाठी मोठ्या चुरशीने मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ९.३० वाजता ९.४८ टक्के मतदान झाले होते. दहाच्या वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत असल्याने मतदानाचा टक्का वाढू लागला आहे.सकाळी ११.३० वाजता आठ पालिका क्षेत्रातील दोन लाख ५७ हजार ९७७ मतदारांपैकी ६३ हजार ९१३ मतदारांनी मतदान केले आहे. यापैकी पुरुष ३४ हजार २६३ आणि महिला २९ हजार ६४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी २४.७७ टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान आष्टा नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त असल्याने नऊ पर्यंत मतदान ठप्प होते. नऊ नंतर मतदान सुरळीत सुरू झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री  शहरातील काही चौकामध्ये लिंबू व भंडारा टाकण्याचा प्रकार घडला असून याची शहरात चर्चा सुरू होती.११.३० वाजेपर्यंत आठ पालिकांतील मतदान टक्केवारीपालिका / मतदानाची टक्केवारी

  • उरुण-ईश्वरपूर / २४.५०
  • विटा / २२.४९
  • आष्टा / २६.६६
  • तासगाव / २४.९०
  • जत / २२.२५
  • पलूस / २५.२३
  • शिराळा / २९.५८
  • आटपाडी / २७.७०

दुपारी ३.३० पर्यंत ५७.८६ टक्के मतदान 

  • उरूण-ईश्वरपूर – ५५.९३%
  • विटा – ५६.९४%
  • आष्टा – ६१.६१%
  • तासगाव – ५४.०६%
  • जत – ५३.६७%
  • पलूस – ५९.४९%
  • शिराळा – ६६.७३%
  • आटपाडी – ६४.७७%
  • सरासरी – ५७.८६%
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Body Elections: Voter Turnout Reaches 24.77% by 11:30 AM

Web Summary : Sangli's local body elections saw enthusiastic voting, with 24.77% turnout by 11:30 AM. Six nagar parishads and two nagar panchayats are participating. Polling is underway in eight municipal areas, with 63,913 voters exercising their right to vote.