शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विटा :  सांगलीतील गर्भपातप्रकरणी विटा येथे माऊली हॉस्पिटलवर छापा : पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:09 IST

सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत तपासणी, कागदपत्रे जप्तविट्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

विटा : सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते. विटा शहरात गेल्या चार दिवसांपूर्वी महाडिक हॉस्पिटलवर छापा टाकून डॉ. अविजित महाडिक यांना अटक केली होती. त्यानंतर आता या गर्भपात प्रकरणी डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या रूग्णालयावर छापा टाकल्याने विट्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चौगुले दाम्पत्याला अटक केली आहे. त्या चौकशीनंतर या प्रकरणाचे कनेक्शन विटा येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे विटा येथील डॉ. अविजित महाडिक यांचे नाव समोर आले. त्यांना रविवारी पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी अटक केली होती. त्यांना दि. २८ पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी रात्री उशिरा उपअधीक्षक अशोक विरकर यांच्यासह पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या विटा येथील माऊली रूग्णालयावर छापा टाकला. 

 

सांगलीच्या चौगुले दाम्पत्याने केलेले गर्भपात गर्भलिंग निदानानंतर केले असतील तर हे प्रकरण केवळ बेकायदेशीरपुरते मर्यादित राहणार नाही, हे उघड आहे. पोलिसांनी विटा येथे माऊली हॉस्पिटलमध्ये गुरूवारी रात्री हाती लागलेल्या पुराव्याबाबत नेमका खुलासा केलेला नाही. परंतु हे प्रकरण गर्भलिंग निदानाच्यासंदर्भात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, माऊली हॉस्पिटलचे डॉ. मेटकरी हे तिरूपती बालाजीच्या दरबारात असल्याने त्यांना तातडीने विट्यात बोलावून घ्या, असे उपअधीक्षक वीरकर यांनी नातेवाईकांना सांगितले. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPolice Stationपोलीस ठाणेSangliसांगली