शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विटा पालिकेचे कर्मचारीच झाले मृतांच्या रक्ताचे नातेवाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोना संसर्गाच्या महामारीत आता जवळचे रक्तातील नातेवाईकही दुरावल्याचे चित्र आज सर्वत्र पहावयास मिळत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कोरोना संसर्गाच्या महामारीत आता जवळचे रक्तातील नातेवाईकही दुरावल्याचे चित्र आज सर्वत्र पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातील कोणीही येत नाही. अशा वेळी विटा न.प.चे कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर नातेवाईक बनून अंत्यसंस्कार करीत आहेत. विटा शहरातील कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या सुमारे पावणे दोनशेहून जास्त मृतांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात दररोज शंभर ते दीडशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत विटा शहरातील पाच, खानापूर पूर्व भागातील दोन अशा एकूण ७ कोविड रुग्णालयात बेडची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू असतानाच कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवरही विटा येथे अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला जात आहे.

सध्या खानापूर तालुक्यात दररोज चार ते पाच जणांचा कोरोनाने मृत्यू होत असल्याची माहिती मिळत आहे. या मृत रुग्णांवर विटा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. काही मृत रुग्णांच्या नातेवाइकांना कळवूनही ते अंत्यसंस्कार विधीकडे फिरकत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अंत्यसंस्कार विधीसाठी विटा न.प.ने नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना मृत रुग्णांचे नातेवाईक होऊन अंत्यविधी उरकून घ्यावा लागत आहे.

विटा स्मशानभूमीत गेल्यावर्षीपासून सुमारे पावणेदोनशे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर पालिकेच्या कोरोना योद्धा टीमने अंत्यसंस्कार करून कर्तव्य बजावले. शनिवारी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी वैकुंठधाम स्मशानभूमीत जाऊन जीवाची पर्वा न करता स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहत कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या टीमची विचारपूस करीत त्यांचे कौतुक केले.

चौकट :

मोफत अंत्यसंस्कार...

सध्या कोरोनाने थैमान घातले असून मृत्यूचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत मृत रुग्णांचे नातेवाईक स्मशानभूमीत येत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी विटा न.प.ने कोविड योद्ध्यांच्या प्रत्येकी पाच जणांच्या दोन टीम तयार केल्या आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या विटा शहरासह परिसरातील रुग्णांच्या मृतदेहांवर कराड रस्त्यावरील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यासाठी पालिकेच्या वतीने कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी सांगितले.