शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

विटा नगराध्यक्षपद; इच्छुकांची मांदियाळी

By admin | Updated: July 12, 2014 00:19 IST

सोमवारी निवड : भावी नगराध्यक्षांचे देव पाण्यात

दिलीप मोहिते ल्ल विटा, विट्याच्या महिला नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता सर्वसाधारण प्रवर्गातील नगराध्यक्षाची निवड होणार असल्याने या पदासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासमोर नगराध्यक्ष निवडीसाठी पेच निर्माण झाला आहे. तरीही गेल्या ४५ वर्षांपासून विटा पालिकेत एकहाती सत्ता काबीज करण्यात यशस्वी झालेला सत्ताधारी गट समाधानकारक तोडगा काढेल, असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे. एकेकाळी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेले कॉँग्रेसचे आ. पाटील व विरोधी विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांनी २०११ च्या पालिकेच्या निवडणुकीत एकत्रित येऊन पालिकेवर झेंडा फडकविला. निवडणुकीनंतर पहिली अडीच वर्षे नगराध्यक्षपद महिला उमेदवारासाठी आरक्षित राहिले. आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी सध्या पक्षप्रतोद वैभव पाटील, नंदकुमार पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव व कृष्णत गायकवाड इच्छुक आहेत. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासमवेत आ. पाटील यांच्यात मुंबई येथे झालेल्या बैठकीत, पुढील कालावधित नंदकुमार पाटील यांना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रमुख दावेदार म्हणून पाटील यांनी हक्क सांगितला आहे.आ. पाटील व गायकवाड यांची युती झाल्यानंतर एका कार्यक्रमात आ. पाटील यांनी, पुढील काळात गायकवाड समर्थकांना संधी देण्याबाबत शब्द दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात गायकवाड समर्थक कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करून कृष्णत गायकवाड यांना संधी देण्याबाबत साकडे घातले होते. मात्र त्यानंतर काही दिवसात पालिका सभागृहात गायकवाड समर्थक नगरसेवकांनी सत्ताधारी मंडळींनी मांडलेल्या ठरावाविरोधात मतदान केल्याने गायकवाड समर्थकांबाबत सध्या पालिकेतील वातावरण गढूळ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गायकवाड समर्थकांवर सत्ताधारी मंडळी नाराज असल्याने आ. पाटील काय निर्णय घेणार, याकडे विटेकरांचे लक्ष लागले आहे. त्यातच पक्षप्रतोद वैभव पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव यांनीसुध्दा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे इच्छुकांची गर्दी वाढली असून याबाबतचा निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे आ. पाटील नगराध्यक्षपदावर कोणाला संधी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.