शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तंबूतांच्या भेटी, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:13 IST

इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत  उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार  सोहळा  हजारों भाविकांच्या  उपस्थितीत  पारंपरिक पद्धतीने संपन्न  झाला.

ठळक मुद्देकडेगावात मोहरमनिमित्त गगनचुंबी तंबूतांच्या भेटी, हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेशडोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार सोहळा

कडेगाव (जि. सांगली) : इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धूला आशा घोषणा देत  उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा दिमाखदार  सोहळा  हजारों भाविकांच्या  उपस्थितीत  पारंपरिक पद्धतीने संपन्न  झाला. हा  भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो  भाविक आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला.मंगळवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर ,शिवाजीनगर ,विहापुर ,सोहोली ,निमसोड ,वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी  11 वाजता मानाचा सात भाई ताबूत   उचलण्यात आला.

येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात  आणण्यात आले. त्यानंतर बागवान  , आत्तार, शेटे ,माईनकर आणि अन्य लहान-मोठे ताबूत माना प्रमाणे उचलण्यात आले.त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा ताबूत उचलण्यात आला.त्यानंतर ताबूतांची प्राथमिक भेटी सोहळा पाटील वाडा(चौकात) संपन्न झालात्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. यावेळी दरम्यान वाटेत तांबोळी ,शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर  मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले.

सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले.त्या ठिकाणी कर्बल , बुधवार पेठ व शुक्रवार पेठ  मेलवाल्याकडून "महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर" ,"तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा , अब एकीका कर दो पुकाराह्ण ह्यहिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे" अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत  मसूद माता ताबूत पंजे , बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. यामध्ये मानाचा सात भाई- पाटील-इनामदार -सुतार-अत्तार-बागवान-माईनकर- तांबोळी-देशपांडे-मसूदमाता -बारा इमाम पंजे- मसूदमाता पंजे वगैरे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी उत्साहात पार पडल्या.

माना प्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला.त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले.दुपारी 2.30 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले. दरम्यान सकाळी 7 वा पासून विटा ,कराड ,सांगली ,सातारा ,कोल्हापूर ,पुणे ,मुबईसह कर्नाटकातून लोक मिळेल त्या वाहनाने कडेगावला येत होते. गावातील रस्ते ,गल्ली ,बोळ आबालवृद्धांनी गजबजून गेले होते.तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम,आमदार पृथ्वीराज देशमुख,जि.प.अध्यक्ष संग्रामसिह देशमुख,जयंत पाटील (कऱ्हाड),भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, भीमराव मोहिते,जितेश कदम,नगराध्यक्षा नीता देसाई,उपनगराध्यक्ष राजू जाधव,चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील,दीपक भोसले,धनंजय देशमुख,विजय शिंदे,रविंद्र देशपांडे,नगरसेवक नितीन शिंदे,सागर सूर्यवंशी,उदयकुमार देशमुख,संगीता राऊत,रिजवाना मुल्ला,संगीता जाधव,मालन मोहिते, तहसीलदार अर्चना शेटे,नायब तहसीलदार राजेंद्र यादव आदी मान्यवर व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांचेसह हिंदू-मुस्लिम बांधव,भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीReligious programmeधार्मिक कार्यक्रमMuslimमुस्लीम