शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरभेटी, फॉर्म नं 6 भरुन घेण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 11:13 IST

मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरभेटी दरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देमतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना घरभेटी दरम्यान सहकार्य कराउपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांचे आवाहन

सांगली : मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरभेटी दरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी यावेळी केले.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने 282 सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी बैठक घेण्यात आली.  

या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, 282 सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सर्व बी.एल.ओ. व पर्यवेक्षक यांना माहे जुलै ते सप्टेंबर 2018 मध्ये वगळणी केलेल्या मतदारांपैकी स्थलांतरित मतदारांशी संपर्क साधून घरभेटी देऊन त्यांच्या रहिवासाबाबत खात्री करुन त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी फॉर्म नं 6 भरुन घेण्याच्या सूचना दिल्या.जे मतदार नमूद पूर्वीच्या राहत्या ठिकाणी आढळून येत नाहीत त्यांना विहित कार्यपध्दती अनुसरुन नोटीस बजावण्यात यावी व साक्षीदारांच्या समक्ष पंचनामा करावा. त्यानुसार पुर्तता अहवाल 30 ऑगस्ट अखेर जिल्हा पुरवठा कार्यालय सांगली येथे सादर करावा.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्राप्त झालेले निवडणूक ओळखपत्र यांचे योग्य मतदाराला वाटप करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी