लोकमत न्यूज नेटवर्क
जत : रॉयल सटन इंडियन्स (बर्मिंगहॅम) आणि युथ फॉर जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.
जत तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार व्हावेत यासाठी रॉयल सटन इंडियन्स आणि युथ फॉर जतचे संस्थापक सदस्य अजय पवार यांच्या प्रयत्नातून इंग्लंडमधील अनिवासी भारतीय बांधवांनी मदत पाठविली आहे.
ग्रामीण रुग्णालय जत येथे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर भेट प्रदान कार्यक्रम आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत झाला. जत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक मोहिते यांच्या हस्ते मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील यांनी सचिव आणि युथ फॉर जतच्या कार्याचे कौतुक केले.
युथ फॉर जतने लसीकरणाची जनजागृती होण्याच्या हेतूने बनवलेल्या फोटो बूथचाही प्रारंभ करण्यात आला. नागरिकांनी लसीकरण केल्यानंतर या फोटो बूथमध्ये फोटो घेऊन इतरांना लस घेण्याबद्दल प्रेरित करावे, असे आवाहन यूथ फॉर जतचे अध्यक्ष दिनेश शिंदे यांनी केले.
उपाध्यक्ष राजकुमार म्हमाणे, सचिव अमित बामणे, सदस्य सचिन जाधव, प्रदीप साळुंखे, प्रमोद साळुंखे, सतीश तंगडी, जितेंद्र बोराडे आदी उपस्थित होते.
.