शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

‘यशवंत’ विकत घेण्यासाठी विश्वजीत कदमांचे अनिल बाबरांशी साटेलोटे, संजय विभुतेंचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 14:31 IST

विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत विश्वजीत कदम यांनी प्रदेश काँग्रेसचा आदेश डावलून शिवसेना (शिंदे गट) व भाजपशी केली युती ​​​​​​​

दिलीप मोहिते विटा (जि. सांगली) : नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना विकत घेताना मिंधे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू नये यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विटा बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी तोडून मिंधे गट व भाजपची हातमिळवणी केली असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी शुक्रवारी विटा येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी प्रदेश कॉँग्रेसचा आदेश धुडकावून आ. कदम यांनी पक्षविरोधी युती केल्याची तक्रार करणार असल्याचेही सांगितले.विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अंतिम क्षणी काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडी करण्याबाबतचा प्रदेश काँग्रेसचा आदेश डावलून शिवसेना (शिंदे गट) व भाजपशी युती केल्यानंतर जिल्हाप्रमुख विभुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. कदम यांच्यावर निशाणा साधला.जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, विश्वजीत कदम यांचे ज्यांनी मंत्रीपद घालवून त्यांना माजी मंत्री केले, ज्यांनी तुम्हाला राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते करून ठेवले तसेच ज्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले त्या मिंधे गट व भाजपशी तुम्ही हातमिळवणी केली. खऱ्या अर्थाने भाजप हाच काँग्रेसचा नंबर एकचा शत्रू आहे. तुम्ही स्वत:ला राज्याचे नेते म्हणवून घेता. पण इथल्या मिंधे गटाच्या आमदारांच्या दावणीला कायमच बांधलेल्या खानापूर तालुका काँग्रेस पदाधिकाºयांचे ऐकून तुम्ही प्रदेश काँग्रेसचा महाविकास आघाडीबाबतचा आदेश धुडकावला.खानापूर काँग्रेसचे पदाधिकारी २४ तास इथल्या आमदारांच्या दारात पडून आहेत. त्यांनी तालुक्यात किती काँग्रेस वाढविली, याचा आढावा आ. कदम यांनी पहिल्यांदा घेतला पाहिजे होता. परंतु, तुम्हाला यशवंत कारखाना विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथल्या आमदारांचा विरोध व नाराजी नको म्हणून तुम्ही साटेलोटे करून सोयीचे राजकारण केले.परंतु, तुम्ही केलेली युती तुम्हाला लखलाभ होवो. इथून पुढे तुमच्याबरोबर आमची कोणतीही आघाडी राहणार नाही. तुम्ही केलेल्या गद्दारीचा हिशोब आगामी काळात आमचे शिवसैनिक चुकता करतील. आम्ही आमचा अहवाल आमच्या पक्षश्रेष्ठीकडे व त्याची दुसरी प्रत कॉँग्रेस पक्षश्रेष्ठीकडेही पाठविणार आहे, असेही जिल्हा प्रमुख संजय विभुते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारElectionनिवडणूक