शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खासदाराच्या होमपीचवर विरोधकांच्या जोर-बैठका! तासगावात विशाल पाटील कुटुंबियांच्या गाठीभेटी, चंद्रहार पाटील यांची मोर्चेबांधणी

By हणमंत पाटील | Published: February 29, 2024 8:39 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे.

कवठे एकंद: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. सध्याचे खासदार संजय पाटील यांच्या तासगावच्या होम पिचवर लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या विरोधकांनी गाठीभेटीचा धडाका लावला आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा वाढता आलेख लक्षात घेता जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या प्रत्येक गावात गट आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा पाठपुरावा करताना त्यांनी स्वतःची वेगळी छाप कार्यकर्त्यांच्यावर टाकली आहे. याच पाठबळावर संजय पाटील यांनी यंदा खासदारकीची हॅट्रिक करण्याचे मनसुबे आखले आहेत.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली जिल्हयात वसंतदादा पाटील घराण्याचा चागलाच दबदबा होता. या पार्श्वभूमीवरच नातू विशाल पाटील यांनी पुन्हा नव्या उमेदीने खासदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. विशाल पाटील यांनी बुधवारी खासदार पाटील यांच्या होमपीचवर म्हणजेच चिंचणी जिल्हा परिषद मतदार संघातील गावांना भेटी देत कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधला. जुन्या - नव्या काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस , अन्य समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करीत खासदारांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. त्यांच्या कुटुंबियांनीही विविध गावागावत गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

पैलवानाचा राजकीय आखाड्यात शड्डू...दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील राजकीय आखाड्यात शड्डू ठोकण्याचे निश्चित केले आहे. गावच्या यात्रेतील कुस्ती मैदाने, बैलगाडी शर्यती व रक्तदान शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकांशी संवाद वाढवला आहे. तासगाव तालुक्यातील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, तसेच कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या किंवा अन्य कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून चाचपणी...लोकसभा निवडणुकीत यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने ही उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. एकूणच लोकसभेच्या निमित्ताने खासदार संजय काका पाटील यांना शह देण्यासाठी विशाल पाटील व चंद्रहार पाटील यांनी बैठकावर जोर लावला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभा