शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीचा वारसा; विराजने राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पटकावले कांस्य पदक, हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचा नातू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:10 IST

सहदेव खोत पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील विराज शंकर आंदळकर याने रायपूर छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत ...

सहदेव खोतपुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील विराज शंकर आंदळकर याने रायपूर छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कांस्य पदक पटकावत स्पर्धेत दमदार कामगिरी केली. विराज हा जागतिक दर्जाचे कुस्तीगीर, हिंदकेसरी, अर्जुनवीर गणपतराव आंदळकर यांचा नातू आहे. कुस्तीतील कुराश प्रकाराबरोबर तो मातीतील कुस्तीचाही सराव करतो. आंदळकरांचा कुस्तीचा वारसा पुढे चालवत असल्याचे त्याच्या यशाने अधोरेखित झाले आहे.विराज हा येथील हिंदकेसरी गणपतराव आंदळकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो गेल्या काही काळापासून कुस्ती, ज्युदो, जलतरण, कुराश, अथलेटिक्स आदी खेळ प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. विशेषतः कुस्ती व कुराश स्पर्धेत तो राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरला आहे. विराज याच्या घरामध्ये कुस्तीची परंपरा आहे. आजोबा हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, मारुतीराव आंदळकर, भानुदास आंदळकर, रघुनाथ आंदळकर, चुलते अभिजीत आंदळकर, लालासाहेब आंदळकर, दत्तात्रय आंदळकर यांच्यानंतर कुस्तीचा वारसा पुढे चालवत आहे. तो एक चपळ कुस्तीगीर असून स्थानिक कुस्ती मैदानातही दमदार कामगिरी करत आहे.राज्य कुराश स्पर्धेत अजिंक्य ठरल्यानंतर तो छत्तीसगड येथे राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील ५५ किलोवरील गटात खेळला. त्यात त्याने कांस्यपदक जिंकत राष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण केला. विराजचे आजोबा हिंदकेसरी आंदळकर यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले होते. त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीची दखल भारत सरकारने त्यांना सर्वोच्च अर्जुन पुरस्कार बहाल केला होता. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही अनेक पुरस्कार देऊन सन्मान केला. शिवाय त्यांच्या गौरवार्थ दिल्लीतील एका वसाहतीला 'गणपत आंदळकर ब्लाॅक' असे नाव देण्यात आले आहे.

लहानपणापासून कुस्तीची आवडविराज सध्या सातवीत शिकत आहे. लहान वयात तो कुस्ती, कुराश तसेच अन्य क्रीडा प्रकारात आंदळकर घराण्याचा क्रीडा वारसा पुढे नेत आहे. विराज यास आतापर्यंतच्या क्रीडा वाटचालीसाठी राज्य कुराश संघटनेचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, कुस्तीगीर राजू साळुंखे, दत्तात्रेय व्यवहारे, शरद अंदुरे, शिक्षण संस्थेचे सचिव दत्तात्रय आंदळकर मुख्याध्यापक अशोक पाटील, क्रीडाशिक्षक अरुण पाटील, संजय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती