शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागेचा उत्पादन खर्च चौपट; दहा वर्षांत उत्पन्न मात्र जैसे थे; शासन पातळीवर उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 18:40 IST

शासन पातळीवर उदासीनता

दत्ता पाटीलतासगाव : जिल्ह्याला जगभर ओळख आणि आर्थिक समृद्धी देणाऱ्या द्राक्षाच्या उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचे गणित कोलमडले आहे. गेल्या दहा वर्षांत द्राक्षाचा उत्पादन खर्च चौपट झाला आहे. मात्र उत्पन्न दहा वर्षांपूर्वी होते तेवढेच राहिले आहे. द्राक्षबागेतून रोजगारनिर्मितीसह आर्थिक चलन मजबूत करणारा उत्पादक  कंगाल होत आहे.दहा वर्षांपूर्वी एक एकर द्राक्षबागेचा सरासरी उत्पादन खर्च ७० हजार रुपये होता, तर उत्पन्न चार ते पाच लाख रुपये होते. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्च सरासरी अडीच लाखापर्यंत गेला असून, दराचे गणित कोलमडल्यामुळे उत्पन्न मात्र चार ते पाच लाखावरच थांबले आहे.जिल्ह्यात द्राक्षबागेचे सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे पाच हजार हेक्टरवरील द्राक्षांची भारताबाहेर निर्यात होते. २१ हजार हेक्टरवरील द्राक्षे देशाच्या कानाकोपऱ्यात विक्रीसाठी जातात, तर सात हजार हेक्टरवरील द्राक्षांचा बेदाणा होतो. द्राक्षबागांच्या माध्यमातून सुमारे ७०० ते ८०० कोटींची उलाढाल दरवर्षी होते.अलीकडच्या काळात पाणी योजनांचे पाणी फिरलेल्या भागात शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची लागवड केली. कोरोना महामारीपूर्वी सर्वाधिक नफा देणारे पीक म्हणून द्राक्षाची ओळख होती. साधारणत: एकरी दोन लाख रुपये खर्च केला तर त्यातून आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र तीन वर्षांपासून बागांची परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.शासन पातळीवर उदासीनताद्राक्ष निर्यातीला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाले आहे. याउलट बांगलादेशात द्राक्ष निर्यात करत असताना यावर्षी तेथे सीमाशुल्क लावल्यामुळे द्राक्ष निर्यात करणे खर्चिक होत आहे. या सगळ्याचा परिणाम खरेदीवर होत आहे. निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय हवा आहे...असा वाढला उत्पादन खर्चमजुरीच्या दरात वाढ, औषधांचा वाढत जाणारा खर्च, अनियंत्रित महागड्या संजीवकांचा आणि केमिकलचा वापर, औषध कंपन्यांची मनमानी, खासगी सल्लागारांचा सुळसुळाट, बेभरवशाचे हवामान अशा अनेक कारणांमुळे द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढत चालला आहे. दुसरीकडे द्राक्षाचा दर मात्र घसरत चालला आहे.कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध झाली नसल्याचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने द्राक्षांची खरेदी केली. यावर्षी हवामान चांगले होते. द्राक्षाची गुणवत्ता आणि दर्जादेखील चांगला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी मक्तेदारी निर्माण केल्यामुळे अपेक्षित भाव मिळाला नाही. 

टॅग्स :Sangliसांगली