शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By संतोष भिसे | Updated: June 12, 2023 19:13 IST

सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेच्या बिळूर (ता. जत) कालव्याचे अर्धवट रखडलेले काम त्वरित सुरु करावे यासाठी बिळूरसह आठ गावांतील ग्रामस्थांनी सोमवारपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरु केले. निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.बिळूर व पंचक्रोशीतील गुगवाड, वज्रवाड, खिलारवाडी, एकुंडी, जिरग्याळ, शेळकेवाडी, शिंगणापूर, मिरवाड या गावांना हा कालवा वरदान ठरणार आहे. कालव्याचे काम अर्धवट झाले असून पूर्ण व्हावे यासाठी ग्रामस्थ दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार ही गावे  'अतिशोषित' वर्गवारीत येतात. त्यामुळे तेथे विहीर खोदण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. त्यामुळे सिंचन योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. कालव्याचे अर्धवट काम अवघ्या काही तासांत पूर्ण होऊ शकते, पण प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. काम तातडीने पूर्ण करुन ओढे, नाल्यांत पाणी सोडावे.आंदोलनात बसगोंडा नाईक, मलगोंडा हेळकर, मलगोंडा कोट्टलगी, प्रकाश बिरादार, चिदानंद चौगुले, बाबाण्णा नाईक, श्रीमंत गुडोडगी, शिवपूत्र नाईक, प्रकाश हेळकर, श्रीशैल कुल्लोळी, रायगोंडा पाटील आदी सहभागी झाले आहेत.

अवघे २०० फुटांचे खोदकाम रखडलेआंदोलकांनी सांगितले की, डफळापूर हद्दीत कालव्याचे अवघे १०० ते २०० फूट मध्ये काम शिल्लक आहे, त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकत नाही. डोळ्यांसमोर पाणी असतानाही मिळत नसल्याने वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन व योजनेच्या व्यवस्थापनाला यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आहेत, पण सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी