ऐतवडे बुद्रुक : देवर्डे (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता कमिटी यांच्याकडून गावात कोरोनाचा बंदोबस्त करण्याचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे गाव आजही कोरोनामुक्त असून नागरिकांनी गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखले आहे.
यावर्षी अद्याप कोरोनाचा शिरकावच गावात झालेला नाही. गावामध्ये यावर्षी कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळेला नाही. प्रशासनाकडून कोरोनाबाबत दिलेले सर्व नियम देवर्डे ग्रामपंचायत व दक्षता समितीकडून काटेकोर अंलबजावणी केली जात आहे. गावात वेळोवेळी लोकांचे प्रबोधन केले जात आहे. ग्रामस्थांनी विनाकारण गर्दी करू नये व घरी राहावे, असे आवाहन केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण केले जात आहे. गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी केली जाते. यासाठी संजयकुमार पाटील, श्रीकांत पाटील, राहुल काळे, ग्रामसेवक आशाराणी पाटील व मोहन पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे परिश्रम कामी येत आहेत.
चौकट
प्रशासन, जनतेचे सहकार्य
देवर्डे गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी, आशा स्वयंसेविका, विविध मंडळे यांचे सहकार्य लाभले. यापुढेही गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे, अशी माहिती देवर्डे उपसरपंच संजयकुमार पाटील यांनी दिली.