शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संख येथे होणार ग्राम न्यायालय; ब्रिटिश राजवटीत होते संस्थानचे न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:03 IST

ग्राम न्यायालय सुरु झाल्यावर तालुक्यातील नागरिक, पक्षकार, वकील यांच्यासाठी सोय व न्यायदान प्रक्रिया लोकाभिमुख होणार आहे.

सांगली/दरीबडची : संख (ता. जत) येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्यास व त्यासाठीची आवश्यक पदनिर्मिती करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.ग्राम न्यायालयासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायाधिकारी), लघुलेखक ग्रेड ३, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बेलिफ कम शिपाई अशा पाच नियमित पदांच्या निर्मितीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे ग्राम न्यायालय आठवड्यातून एक दिवस भरेल.संख येथील परिसरात ३२ गावे असून तेथील ग्रामस्थांना या ग्राम न्यायालयाचा फायदा होईल. दर शुक्रवारी (शासकीय सुट्टी वगळून) न्यायालय भरेल. संख येथील ग्राम न्यायालयाचे कामकाज दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जत या न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी कामकाज पाहतील. ग्राम न्यायालय सुरु झाल्यावर तालुक्यातील नागरिक, पक्षकार, वकील यांच्यासाठी सोय व न्यायदान प्रक्रिया लोकाभिमुख होणार आहे.जिल्ह्यात जत तालुका सर्वात मोठा तालुका आहे. तालुक्यात महसूल विभागाची १२३ गावे व २४२  वाड्यावस्ती आहेत. महसूल विभागाचे प्रशासन गतिमान होण्यासाठी २६ जानेवारी २०१८ रोजी संख येथे अपर तहसील कार्यालय सुरू झाले. अपर तहसील कार्यालयाअंतर्गत ५१ गावांचा व चार महसूल मंडल विभागांचा यांचा समावेश झाला. यामध्ये संख, माडग्याळ, उमदी, तिकोंडी यांचा समावेश होता.तालुका विस्ताराने मोठा असल्याने लोकांना न्यायालयीन कामकाजासाठी जतला जावे लागते. पूर्व भागात दिवाणी व फौजदारी खटल्यांची संख्या अधिक असल्याने कनिष्ठस्तर न्यायालय किंवा ग्रामन्यायालयाची निर्मिती करावी, अशी मागणी दहा वर्षांपासून केली जात होती.संख येथे पूर्वी होते संस्थानचे न्यायालयब्रिटिश राजवटीत संखला डफळे संस्थानिकांचे न्यायालय सुरु होते. न्यायदानाचे प्रत्यक्ष कामकाज सुरु होते. न्यायाधीश स्वतः येऊन न्यायदान करीत होते. स्वातंत्र्यानंतर ते बंद झाले. आता स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवात पुन्हा ग्राम न्यायालय सुरु झाले आहे.इमारतीची अडचणग्रामन्यायालय सुरु करण्यासाठी इमारतीची मुख्य अडचण आहे. तात्पुरती स्वरुपात पाटबंधारे विभागाचे रिकामे इमारती घ्यावी लागणार आहे. 

"ग्राम न्यायालयाचा जत पूर्व भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे लवकरात लवकर केसेसचे निकाल लगण्यास मदत मिळणार आहे. वेळ व पैसा वाचणार  आहे.  - आर. के. मुंडेचा, अध्यक्ष जत तालुका वकील संघटना 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयासाठी सकारात्मक निर्णय घेतला.संख व गगनबावडा या दोन ठिकाणी ग्रामन्यायालयाला मंत्रिमंडळा करण्याचा निर्णय झाला. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे. सरकारचे आभार मानतो. - विक्रम सावंत, आमदार

टॅग्स :SangliसांगलीEknath Shindeएकनाथ शिंदे