शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपसोबतच राहणार, विलासराव जगतापांनी केलं स्पष्ट 

By अशोक डोंबाळे | Updated: April 22, 2023 18:02 IST

विलासराव जगताप यांनी आपण भाजपच्या पॅनेलमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती

जत : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एक पाऊल मागे घेत सांगलीबाजार समिती निवडणुकीत भाजपसोबत राहणार आहे. कालचा निर्णय हा माझा वैयक्तिक होता. मात्र कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतर आजपासून भाजपच्या पॅनेलचा प्रचार सुरू करणार आहे. याबाबत कुणीही संभ्रम बाळगू नये, असे प्रतिपादन जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.खासदार संजय पाटील यांनी विश्वासघात करत भाजपच्या जत तालुकाध्यक्षांना उमेदवारी नाकारल्याने शुक्रवारी रात्री विलासराव जगताप यांनी आपण भाजपच्या पॅनेलमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, शनिवारी भाजप पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्त्यांची माजी आमदार विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी बैठक झाली.यावेळी कार्यकर्त्यांनी विराेधकांना फायदा हाेऊ नये, यासाठी आपण एकसंध हाेऊन भाजपच्या पॅनेलमधूनच निवडणूक लढवू, अशी भूमिका जगताप यांच्यासमाेर मांडली. अखेर विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजप पॅनेलमध्ये सक्रिय राहून पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.जगताप म्हणाले, कालचा निर्णय हा माझा वैयक्तिक होता. आजपासून भाजपच्या पॅनेलचा प्रचार सुरू करणार आहोत. कुणीही संभ्रम बाळगू नये, आपले पॅनेल विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाMarketबाजारElectionनिवडणूक