शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रम बांदल विट्याचे नवे प्रांताधिकारी, येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार

By श्रीनिवास नागे | Updated: June 13, 2023 13:02 IST

अत्यंत शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित

विटा: खानापूर-विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. विक्रम वसंतराव बांदल यांची नियुक्ती करण्यात आली. विट्याचे नवे प्रांताधिकारी म्हणून डॉ. बांदल हे येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार आहेत.प्रांताधिकारी भोर यांनी मे २०२० मध्ये खानापूर-आटपाडीचा पदभार हाती घेतला होता. त्यांचा तीन वर्षाचा प्रशासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. गेल्या तीन वर्षातील त्यांची प्रशासकीय कारकीर्द चांगली झाली असली तरी मध्यंतरी त्यांच्यावर काही तक्रारी झाल्या होत्या.आता विट्याचे नवे प्रांताधिकारी म्हणून डॉ. विक्रम बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१४ च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी आहेत. पुसेगाव (जि. सातारा) येथील शासकीय विद्यानिकेतन शाळेतील सन २००० च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते जळगाव जिल्ह्यातील पाचोडा उपविभागाचे प्रांताधिकारी म्हणून काम करीत होते. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील हिंगवली (ता. भोर) गावचे रहिवाशी आहेत. त्यांची खानापूर-आटपाडीचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ते अत्यंत शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित आहेत.

टॅग्स :Sangliसांगली