शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

Sangli: विजय ताड खून प्रकरण: पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत अखेर शरण  

By घनशाम नवाथे | Updated: May 29, 2024 20:24 IST

Sangli News: जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

- घनशाम नवाथे सांगली  - जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. खून प्रकरणात आता जत पोलिस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असे सांगण्यात आले.

अधिक माहिती अशी, १७ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मृत विजय ताड हे मोटार (एमएच १० सीएन ०००२) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला. जत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

ताड यांच्या खुनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (वय २४ रा. के एम हायस्कुलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. आर. आर. कॉलेजजवळ जत) या चौघांना अटक केली. पोलिस तपासात चौघांकडून गुन्हयात वापरलेली तीन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, दोन जादा मॅग्झीन, सहा पुंगळ्या, दोन दुचाकी, दोन एअरगन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताड यांचा खून मुख्य सुत्रधार उमेश सावंत याच्या चिथावणीवरुन तसेच नियोजन करुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता. त्याची माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगून २५ हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते. खुनातील संशयित पाच आरोपींना मोका देखील लावण्यात आला होता. उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला होता. तसेच त्याला फरार घोषित करण्यात आले होते.

बुधवारी उमेश सावंत हा जिल्हा न्यायालयात शरण आला. न्यायाधीशांनी त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली. आता जत पोलिस खून प्रकरणात न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा ताबा घेतली. त्यानंतर खुनाचा तपास करतील.

अनैतिक संबंधाच्या संशयातून खून विजय ताड याचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आता उमेश सावंतच्या अटकेनंतर तपासात खरे कारण उघड होईल. त्यामुळे जत पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी