शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 15:10 IST

सांगली : महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने ...

ठळक मुद्देज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचे निधनमहाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष

सांगली : महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या ंिचंतामणीनगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी (वय ५७) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.सांगलीत २0१२ मध्ये पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते कार्यवाह होते. महाविद्यालयीन जीवनापासून ते नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. एकांकिका आणि नाटकांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

विविध नाटकांमध्ये दर्जेदार अभिनय करून त्यांनी या क्षेत्रावर छाप पाडली. नाट्यपंढरी सांगलीतील विविध संस्थांशी ते जोडले गेले. सांगलीतील अबकड कल्चरल ग्रुपचे ते संस्थापक संचालक होते.

नाट्यचळवळ वाढावी म्हणून त्यांनी नाट्य परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेची स्थापना केली. त्याचे ते अध्यक्ष होते. शाखेच्या माध्यमातून त्यांनी बालनाट्य शिबिर, सुगम संगीत, भावगीत स्पर्धांचे आयोजन केले. नाट्य प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून नवे कलाकार त्यांनी तयार केले.राज्यभरातील विविध नाट्यस्पर्धांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम केले. गेल्या काही वर्षात अनेक नाटकांचे यशस्वी दिग्दर्शनही त्यांनी केले. राज्यभरातील दिग्गज रंगकर्मी, ंिचत्रपट अभिनेत्यांशी त्यांचे जिव्हाळ््याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने नाटयक्षेत्राला धक्का बसला.

रंगकर्मी, अभिनेते व तंत्रज्ञ यांच्यामार्फत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सांगलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :NatakनाटकSangliसांगलीcultureसांस्कृतिक