शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांचा १० जुलैला सत्कार, शंभराव्या वाढदिवसानिमित्त गौरव

By अशोक डोंबाळे | Updated: June 30, 2023 18:52 IST

सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने दि. १० जुलैला वयाच्या शंभरीत पदार्पण करत आहेत. याबद्दल येथील सर्व पुरोगामी संघटना, ...

सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने दि. १० जुलैला वयाच्या शंभरीत पदार्पण करत आहेत. याबद्दल येथील सर्व पुरोगामी संघटना, पक्षांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लोकचळवळीच्या नेत्या मेघा पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. निरंजन टकले उपस्थित राहणार आहेत.माधवराव माने यांच्या सत्काराच्या तयारीबाबत पुरोगामी चळवळीतील संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सदाशिव मगदुम, शहाजी जाधव, हसन देसाई, विकास मगदुम, ॲड. सुभाष पाटील, शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे आदीसह मान्यवर उपस्थित होते. आमदार अरुण लाड, माजी आ. प्रा. शरद पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. प्रा. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, महापौर दिग्विजय सूर्यवंशी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.पृथ्वीराज पाटील व विकास मगदुम म्हणाले, येळावी (ता. तासगाव) येथे १० जुलै, १९२४ रोजी माधवराव भुजंगराव माने यांचा जन्म झाला. तासगाव हायस्कूल येथे शिक्षण घेत असतानाच ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना गुरू मानून शालेय शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उतरले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२चा ब्रिटिशविरोधी ‘चले जाव’चा लढा सुरू झाला आणि ३ ऑगस्ट, १९४२ रोजी तासगावच्या मामलेदार कचेरीवर १० हजारांचा मोर्चा काढून ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा ध्वज फडकावण्यात ते यशस्वी झाले. नऊ क्रांतिकारकांना ठार मारणाऱ्या फौजदाराच्या घरावर बॉम्ब टाकण्यात सहभाग घेतला. याच कारणास्तव नऊ महिने कारावास भोगला. माने यांचा सोमवार, दि. १० जुलैरोजी दुपारी दोन वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सत्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली