शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
3
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
4
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
5
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
6
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
7
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
8
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
9
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
10
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
11
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
12
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
13
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
14
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
15
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
16
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
17
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
18
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
19
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
20
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले

मणदूरच्या वाड्या-वस्त्यांचा निवडणुकीवर बहिष्कार?

By admin | Updated: July 12, 2014 00:21 IST

ग्रामस्थ आक्रमक : दळणवळणाची सुविधा नसल्याचा निषेध

वारणावती : शिराळा पश्चिम भागातील मणदूर हे ४५०० लोकवस्तीचे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव. पैकी ३००० लोकसंख्या मणदूरची, तर उर्वरित १५०० वस्ती चार किलोमीटरवर वसलेल्या मिरुखेवाडी, सिध्देश्वरवाडी, विनोबाग्राम व मणदूरचा धनगरवाडा या वाड्या-वस्त्यांची. या चारही वाड्या-वस्त्यांवर निसर्गाने कृपा केली. मात्र शासन आणि प्रशासनाची मात्र गेल्या १५ वर्षांपासून अवकृपाच झाली आहे.या वाड्यांना पक्के रस्ते नाहीत. आजही येथे कोणतीच दळणवळणाची सुविधा नाही. सह्याद्रीच्या कड्याकपारीत या वस्त्या आहेत. येथील ग्रामस्थांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मणदूरला चालत यावे लागते. पावसाळ्यात तर येथे मुसळधार पाऊस पडतो. एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा महिलेच्या प्रसुतीचा प्रश्न निर्माण झाला, तर पाळणा करुन भर पावसात मणदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते. गेल्या १५ वर्षापासून येथील ग्रामस्थ रस्त्यांअभावी हालअपेष्टांचे जीणे जगत आहेत. येथून साधी दुचाकीही जात नाही. काही रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत.मणदूर ग्रामपंचायतीने वारंवार सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंत्यांना रस्त्यासाठी निवेदन दिले, आंदोलनाचे इशारे दिले. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. ग्रामपंचायतीने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांचे काम करावे, असा पाठपुरावाही केला. मात्र तोही प्रस्ताव धूळ खात पडला. रस्ताच नसल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही आरोग्याच्या सुविधा वाड्या-वस्त्यांवर पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासन व प्रशासनाने आता लक्ष न दिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मिरुखेवाडी, सिध्देश्वरवाडी, विनोबा ग्राम व मणदूर धनगरवाडा ग्रामस्थांनी घेतला आहे. मणदूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुवर्णा पाटील, उपसरपंच विजय माने, विकास सोसायटीचे अध्यक्ष सावळा पाटील यांच्या उपस्थितीत पांडुरंग सोनवणे, बळवंत मिरुखे, हरिभाऊ मिरुखे, बाळकू डोईफोडे, विठोबा शेळके, मारुती कानवे आदी ग्रामस्थांनी हा मनोदय बोलून दाखवला आहे. (वार्ताहर)