शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सांगलीत ३२ कोटींची वाहन विक्री

By admin | Updated: March 22, 2015 00:23 IST

गुढीपाडव्याचा मुहूर्त : आणखी ३७०० नवी वाहने रस्त्यावर, दहा टक्के वाढ

सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज (शनिवार) सांगलीतील वाहन शोरूममधून तब्बल ३२ कोटी ७१ लाखांची वाहन विक्री झाली. गतवर्षाची तुलना केल्यास जवळपास दहा टक्क्यांनी वाहन विक्री वाढली असल्याचे वाहन वितरकांनी सांगितले. आजच्या विक्रीने ३७०० नवी वाहने रस्त्यावर आली आहेत. येथील सिध्दिविनायक अ‍ॅटोमोबाईलमधून १०५० दुचाकींची विक्री झाली. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे दहा टक्के विक्रीत वाढ झाल्याची माहिती संचालक श्रीकांत तारळेकर यांनी दिली. सांगलीतील पोरेज शोरूममधून ८३० दुचाकींचे पाडव्याच्या मुहूर्तावर वितरण करण्यात आले. गतवर्षाच्या तुलनेत दहा टक्के विक्री वाढली असल्याचे वितरक अविनाश पोरे यांनी सांगितले. ट्रायकलर होंडा शोरूममधून ४२५ दुचाकींची विक्री झाल्याची माहिती अमित मगदूम यांनी दिली. येथील मिलेनियम होंडा, घाटगे-पाटील शोरूम येथून ६६० दुचाकी, त्याचबरोबर इतर ठिकाणांहूनही ३५० दुचाकींची विक्री झाली. सांगलीतून सुमारे ३५०० दुचाकींची आज विक्री झाली. मोटार वितरणासाठीही पाडव्याचा मुहूर्त चांगला ठरला आहे. शहरातील तीन शोरूममधून २७३ मोटारी वितरित करण्यात आल्या. येथील पंडित अ‍ॅटोमोबाईलमधून १०० मोटारी वितरित झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत मागणी स्थिर होती, अशी माहिती विक्री व्यवस्थापक एस. व्ही. जोशी यांनी दिली. चौगुले इंडस्ट्रीजमधून १७३ मोटारी पाडव्याच्या मुहूर्तावर वितरित झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत तब्बल तीस टक्के वाहन विक्री वाढल्याची माहिती वरिष्ठ विक्री व्यवस्थापक निलेश पोतदार यांनी दिली. शहरातील तीन शोरूममधून ६१ ट्रॅक्टरचीही विक्री झाली. स्वप्नपूर्ती मोटर्समधून २२ ट्रॅक्टरची विक्री झाल्याची माहिती सुभाष फुलारी यांनी दिली. समर्थ ट्रॅक्टर्समधून २२ ट्रॅक्टर गेल्याची माहिती राजेंद्र गुरव यांनी दिली. णमो ट्रॅक्टर्समधून १७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली. सांगलीतून १६ कोटी ६२ लाखांची दुचाकी, २ कोटी ४४ लाखांचे ट्रॅक्टर, तर १३ कोटी ६५ लाखांची मोटार विक्री झाली. (प्रतिनिधी) अवकाळीचा ट्रॅक्टर विक्रीला फटका दुचाकी व मोटार विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी ट्रॅक्टर विक्रीला मात्र फटका बसला आहे. यंदा ट्रॅक्टर विक्रीला सुमारे पंधरा टक्के फटका बसल्याची माहिती ट्रॅक्टर विक्रेते जयकुमार बाफना यांनी दिली. अवकाळी पावसाचा फटका, उसाचे बिल थकित आदी कारणांमुळे ट्रॅक्टर विक्रीवर परिणाम झाला. यावर्षी बागकामासाठी लागणाऱ्या लहान ट्रॅक्टरनाच मागणी अधिक होती.