लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील वाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पार पडली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष किरण नांगरे यांनी संस्थेच्या सभासदांना ७ टक्के लाभांश जाहीर केला.
अहवाल वाचन सचिव भगवान मोहिते यांनी केले. अध्यक्षस्थानी किरण नांगरे होते. कोरोना महामारीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता ज्यँनी काम केले. अशा ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, सोसायटी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, डॉ. भूषण चौगुले, विजय पळसे, दत्तात्रय पंडित या कोविड योध्द्यांचा संस्थेतर्फे सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष किरण नांगरे, उपाध्यक्ष शिवाजी गावडे, सरपंच सुरेश साठे, अशोक पाटील, हेमंत मुळीक, अरुण बर्डे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, राहुल चव्हाण, सुधाकर यादव, अशोक पाटील, शंकर खोत, शंकर मुळीक, गुणवंत चव्हाण, आनंदीबाई यादव, पोलीसपाटील संतोष करांडे उपस्थित होते.