शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चौदा कोटी ७९ लाखांचा व्हॅट चुकवला, दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा

By घनशाम नवाथे | Updated: August 16, 2024 19:24 IST

सांगली : कुपवाड एमआयडीसीतील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिलने तब्बल १४ कोटी ७९ लाख १८ हजार ५२ रूपयांचा मुल्यवर्धित कर ...

सांगली : कुपवाड एमआयडीसीतील नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिलने तब्बल १४ कोटी ७९ लाख १८ हजार ५२ रूपयांचा मुल्यवर्धित कर (व्हॅट) चुकवल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत नवमहाराष्ट्र चाकणचे व्यापारी योगेश नरसुदास शेठ (वय ५६, रा. सिप्ला फाऊंडेशनजवळ, वारजे, पुणे) व मदन मोतीलाल बोरा (वय ६२, रा. नवमहाराष्ट्र हाऊस, शनिवार पेठ, पुणे) या दोघांविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

जीएसटी विभागाने दिलेली माहिती अशी, व्यापारी योगेश शेठ व मदन बोरा यांचा पशु खाद्य, खाद्य तेल, सरकी पेंड आदी वस्तूंचे उत्पादन व विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची मे. नवमहाराष्ट्र चाकण ऑईल मिल कुपवाड एमआयडीसीमध्ये आहे. त्यांचा व्यवसाय महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा २००२ नुसार नोंदवण्यात आला आहे. त्यांनी दि. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१७ अखेर मुल्यवर्धित कर (व्हॅट) तसेच त्यावरील व्याज, शास्ती भरली नाही.थकीत व्हॅट भरण्यासाठी नवमहाराष्ट्र चाकणचे योगेश शेठ यांना दि. २२ फेब्रुवारी व दि. ९ जुलै २०२४ रोजी आणि मदन बोरा यांना दि. २४ जुलै २०२४ रोजी नोटीस बजावली. त्यानंतर त्यांनी कर भरणा केला नाही. त्यामुळे व्हॅट कायद्यातील कलमानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीस नोंदणीकृत ई-मेलवर बजावण्यात आली. परंतू नोटीसीबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही किंवा उत्तर दिले नाही.

नवमहाराष्ट्र चाकणकडील थकीत व्हॅटचा भरणा करण्यासाठी शेठ आणि बोरा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने सांगलीचे राज्यकर उपायुक्त यांनी निरीक्षक वैभव माने यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माने यांनी शेठ व बोरा यांच्याविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दि. १ एप्रिल २०१३ ते दि. ३१ मार्च २०१७ या कालावधीत १४ कोटी ७९ लाख १८ हजार ५२ रूपयांचा व्हॅट चुकवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीTaxकरCrime Newsगुन्हेगारी