शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

संततधारेमुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:42 PM

सांगली : वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात पाचव्यादिवशी अतिवृष्टी होऊन चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाचे चार दरवाजे दोन मीटरने उंचलले असून, ११ हजार ९३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे दुपारी तीनपासून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शिवारात शिरले आहे. नदीवरील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटबंधारे ...

सांगली : वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात पाचव्यादिवशी अतिवृष्टी होऊन चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाचे चार दरवाजे दोन मीटरने उंचलले असून, ११ हजार ९३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे दुपारी तीनपासून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शिवारात शिरले आहे. नदीवरील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस चालूच होता.वारणा धरण क्षेत्रातून १४ हजार ७३ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक धरणात होत आहे. धरण क्षेत्रात सलग पाचव्यादिवशी अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा धरणात २८.९७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, चार दरवाजे सव्वादोन मीटरने उचलल्यामुळे धरणातून दुपारपासून बारा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या वस्त्यांवरील कुटुंबांनी जनावरे, साहित्य गावामध्ये हलविले आहे. महावितरणनेही नदीकाठच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद केला आहे. वारणा नदीवरील पूल आरळा-शित्तूर, कोकरुड-रेठरे बंधारा आणि मांगले-काखे पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाहूवाडी ते शिराळा तालुक्यातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.कोयना धरण क्षेत्रातही चोवीस तासात १९२ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणात ७१.९९ टीएमसी पाण्याचा साठा झाला आहे. मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास कोयना धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिला आहे. यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णेची पाणीपातळी १७ फुटांवर गेली आहे.