शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

मुंबईचे वऱ्हाड विटा पोलिसांच्या दारात!

By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST

पोलीस उपअधीक्षकांची मध्यस्थी : लेखी जबाबानंतर विवाह समारंभच रद्द

विटा : नवरा मुलगा विट्याचा, तर नवरी मुलगी मुंबईची. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून रेशीमगाठी बांधण्यासाठी दोन्ही कुटुंबांची जवळीक... साखरपुडा झाल्यानंतर नियोजित वर-वधूची मोबाईलवरून आणखी जवळीक... दोन्ही कुटुंबांच्या वाढत्या आशा-अपेक्षा... विवाहाला २४ तासांचा अवधी... विवाहासाठी आज (सोमवारी) मुंबईचे वऱ्हाड विट्यात दाखल झाले... पण त्या वऱ्हाडाला लग्नमंडपात नव्हे तर विटा पोलिसांच्या दारात जावे लागले!सातारा येथे नोकरी करणाऱ्या विटा येथील एका युवकाचा विवाह मुंबईस्थित तरुणीशी उद्या, मंगळवारी येथील एका मंगल कार्यालयात होणार होता. दोघेही उच्चशिक्षित. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून त्या दोन कुटुंबांची ओळख झाली. साखरपुडाही झाला. विवाहासाठी दि. १० फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यासाठी विट्यातील मंगल कार्यालयाचे बुकिंग करण्यात आले. परंतु, साखरपुडा झाल्यानंतर पाच ते सहा दिवसातच दोन्ही कुटुंबांच्या आशा-अपेक्षा वाढत गेल्या. शिवाय बाहुल्यावर चढण्याआधीच नियोजित वर-वधूतही वादाची दरी वाढत गेली, तरीही उद्या विटा येथे विवाह असल्याने नियोजित वधूकडील मूळ वऱ्हाडी मंडळी मुंबईहून आज विट्यात दाखल झाली. त्यावेळी दोन कुटुंबात पुन्हा वाद पेटला. शेवटी मुंबईची वऱ्हाडी मंडळी थेट विटा पोलिसांच्या दारात हजर झाली. त्यावेळी नियोजित वराकडील वऱ्हाडी मंडळींनाही पोलीस ठाण्यात बोलावणे धाडण्यात आले. वराकडील मंडळी सायंकाळी सह वाजता पोलिसांच्या दारात आली.डॉ. अभिजित पाटील यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेतले. वराच्या नातेवाईकांनी हा विवाह होणार नाही, असा पवित्रा घेतला, परंतु नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण दिल्याने व साखरपुडा झाल्याने चारचौघांत वेगळी चर्चा होणार, या भीतीने वधूच्या नातेवाईकांनी मिळते-जुळते घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय वराच्या नातेवाईकांनी फेटाळून लावला. शेवटी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी वधू व तिच्या नातेवाईकांना पुढील धोका समजावून सांगून हा विषय येथेच थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे नियोजित वर-वधूच्या नातेवाईकांनी यापुढे दोन्ही कुटुंबांत कोणताही संबंध राहणार नसल्याचे सांगून तसा लेखी जबाब पोलिसांत दिला! (वार्ताहर)शहरात चर्चानियोजित विवाहच रद्द करून मुंबईची वऱ्हाडी मंडळी विटा पोलीस ठाण्यातून रात्री उशिरा मुंबईकडे मार्गस्थ झाली. उद्या होणारा नियोजित विवाह असा अचानक रद्द झाल्याने व या विवाहासाठी आलेले मुंबईचे वऱ्हाड थेट विटा पोलिसांच्या दारात गेल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू होती.