शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेणी खोऱ्यात बिबट्याचा वावर - वन विभागाने लावले फलक जागोजागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:05 IST

चरण येथील शेतकऱ्याला बिबट्याने जखमीही केले आहे. बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत शिराळा वन विभाग दक्षता घेत आहेच. जेथे हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी वावर : दक्षतेचे आवाहनबिबट्याच्या आढळ क्षेत्रात वन विभागामार्फत फलक

सहदेव खोत ।पुनवत : शिराळा तालुक्याच्या अनेक भागात बिबट्याचा वावर व पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. वन विभागाने बिबट्याच्या सध्याच्या वावराची ठिकाणे निश्चित करून येथे ‘बिबट्या प्रवण क्षेत्र’ असे फलक लावून नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

शिराळा तालुक्यात मेणी खोरे, चरण, वाकुर्डे, बिळाशी, कुसाईवाडी, अंत्री, बिऊर, कांदे, मांगले आदी भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या सर्व भागात बिबट्याकडून शेळ्या, जनावरांवर हल्ले झाले आहेत. यात काही प्राणी दगावलेही आहेत. नुकतेच चरण येथील शेतकऱ्याला बिबट्याने जखमीही केले आहे. बिबट्याचा वावर व हल्ले याबाबत शिराळा वन विभाग दक्षता घेत आहेच. जेथे हल्ले होत आहेत, त्या ठिकाणी तातडीने धाव घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या बिबट्याचा वावर असलेल्या अंत्री बुद्रुक, वाकुर्डे बुद्रुक, पडवळवाडी, कुसाईवाडी आदी ठिकाणी वन विभागाने ‘बिबट्या प्रवण क्षेत्र’ म्हणून फलक लावले आहेत. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

अफवा नकोतबिबट्याचा वावर व हल्ले याबाबत सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. बिबट्याबाबत कुणीही चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नयेत, असे शिराळा वन विभागाने स्पष्ट केले. 

तालुक्याच्या काही भागात बिबट्याचा वावर आहे. बिबट्याचे सहजीवन नागरिकांनी समजावून घ्यावे. पाळीव प्राण्यांसह अनेक प्राणी बिबट्याचे भक्ष्य आहे. तो मनुष्यावर मुद्दाम हल्ला करत नाही. शेतात जाताना लोकांनी योग्य खबरदारी घ्यावी. वन विभागाशी संपर्क करावा.-सुशांत काळे, वनक्षेत्रपाल, शिराळा

टॅग्स :forest departmentवनविभागSangliसांगली