शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : सांगलीत ‘व्हॅलेंटाईन डे’वर मंदीचे सावट, फुले, भेटवस्तू यांना कमी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:45 IST

मंदीला कवेत घेऊन महागाईप्रती प्रेमगीत गात यंदाचा  ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. दरवर्षी येणारा प्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी असल्याची माहिती सांगलीतील विक्रेत्यांनी दिली.

ठळक मुद्देप्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी

सांगली : मंदीला कवेत घेऊन महागाईप्रती प्रेमगीत गात यंदाचा  ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. दरवर्षी येणारा प्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी असल्याची माहिती सांगलीतील विक्रेत्यांनी दिली.

‘व्हॅलेंटाईन डे’ साठी यंदा भेटवस्तूंमध्ये टेडी, म्युझिकल डोम, लायटिंग डोम, मेसेज इन बॉटल, ओरियन लॉकेटस्, गोल्डन रोज, कपल स्टॅच्यू, पॉप-अप कार्ड, ख्र्रिस्टलचे लव्ह कोटेशन्स्, स्मॉल किचैन टेडी, कोरियन लॉकेटस्, रिंग्ज, इअर रिंग्ज आदी वस्तू दाखल झाल्या आहेत. यातील चोवीस कॅरेट गोल्डन रोझला सर्वाधिक मागणी दिसून येते.

‘व्हॅलेंटाईन डे’साठी अनेक प्रकारचे चॉकलेटस् दाखल झाले आहेत. यामध्ये ३५ रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची व्हरायटी पाहायला मिळते. चॉकलेटवर सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येत आहे.

यंदा स्माईली इमोजी स्टाईलचे चॉकलेटस आली आहेत. याची २0 रुपये किंमत आहे. चॉकलेट बास्केट, शॅम्पेन चॉकलेट, रोज चॉकलेट, हार्टशेप चॉकलेट असे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. मोबाईलच्या युगात गेल्या काही वर्षांपासून ग्रिटिंग्ज कार्डना मागणी घटली असली तरी, यंदा पॉप-अप प्रकारातील ग्रिटिंग कार्डची चलती आहे.फुलांचा दर स्थिरव्हॅलेंटाईन डे आणि डच गुलाबाचे घट्ट नाते गेल्या काही वर्षात निर्माण झाले आहे. दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने डच गुलाबाचा भाव वधारतो. यंदा सांगलीत त्याचे दर स्थिर राहिले आहेत. डच गुलाबाचा दर मंगळवारी प्रतिनगर २0 ते २५ रुपये इतका, तर जरबेराचा दर १0 ते १५ रुपये होता. 

व्हॅलेंटाईन डे निमित्ताने अनेक प्रकारच्या भेटवस्तू आमच्याकडे उपलब्ध झाल्या असल्या तरी, मागणी फारशी नसल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासूनची ही स्थिती आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बुधवारी मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे.- संदीप सकळे,भेटवस्तू विक्रेते, सांगली

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेSangliसांगली