लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात २०,९८६ जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली. लसीचे अत्यल्प डोस शिल्लक असल्याने शनिवारी पूर्ण क्षमतेने लसीकरण होऊ शकणार नाही.
जिल्ह्याला शुक्रवारी लसीचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. गुरुवारी फक्त २० हजार डोस मिळाले होते. त्यातील तीन हजार डोस महापालिकेला देण्यात आले. उर्वरित लसीचे जिल्हाभरात वितरण झाले. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. शुक्रवारी २६७ केंद्रांवर चांगले लसीकरण झाले. नागरिकांनी रांगा लाऊन लस घेतली, त्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त होती.
संध्याकाळपर्यंत साठा संपल्याने शनिवारी लसीकरण ठप्प होणार आहे.
चौकट
शुक्रवारी दिवसभरात लसीकरण असे
ग्रामीण भागात - १५,६८२
निमशहरी भागात - २,५५८
महापालिका क्षेत्रात - २७४७
गुरुवारी एकूण - २०,९८७
आजवर एकूण - ५,६०,५१७