लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोणी डोळ्याच्या नंबरचा चष्मा आहे म्हणून तर, कोणी फॅशन म्हणून काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करतो. सध्या काॅन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे; पण लेन्सचा वापर करताना खूप काळजी घेतली नाही, तर डोळ्याला इजा होण्याचा धोका असतो.
काहींना लेन्स सूट होते, तर काहींना ती सूट होत नाही. अशा वेळी डोळ्याला खाज येणे, चुरचुरणे, डोळे लाल होणे, पापण्यांना सूज येणे, अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
चौकट
चष्म्याला करा बाय बाय
चष्माचा नंबर खूप प्लस, मायनस असलेली व्यक्ती काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करू शकते. सर्वच वयोगटातील व्यक्तींना या लेन्सचा वापर करता येतो. डोळ्याचे इन्फेक्शन, डोळ्यात कोरडेपणा असेल, तर मात्र लेन्सचा वापर टाळलेला बरा.
चौकट
...ही घ्या काळजी
१. काॅन्टॅक्ट लेन्स बसविलेल्या व्यक्तीने डोळ्यांची फार काळजी घ्यावी, डोळे चोळू नयेत. डोळ्यात काजळ घालू नये.
२. घराबाहेर पडताना जोराचा वारा, धुळीच्या संरक्षणापासून शून्य नंबरचा चष्मा वापरावा. धुळीचे कण, वाऱ्यामुळे लेन्सला धोका पोहोचू शकतो.
चौकट
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
- अत्याधुनिक उपचार पद्धतीद्वारे डोळ्याच्या आजारावर उपचार होत आहेत. काॅन्टॅक्ट लेन्स वापरणे हे फायद्याचेच आहे. सध्या उच्च प्रतीच्या लेन्स मिळतात. डोळ्यांची निगा व काळजी घेतल्यास लेन्सचा पर्याय उत्तम आहे.
-डाॅ. दिलीप पटवर्धन