शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

शिवराज्याभिषेकाच्या क्विल्ट कलाकृतीचे सांगलीत अनावरण-श्रुती दांडेकर यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:21 IST

सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी

ठळक मुद्देजागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प

सांगली : सांगलीच्या डिझायनर श्रुती दांडेकर यांनी दहा महिन्यांच्या अथक् परिश्रमातून कापडाचे तब्बल २० हजार २८८ तुकडे जोडून शिवराज्याभिषेकाची कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीचे सादरीकरण बुधवारी सांगलीत झाले.

तब्बल १९ बाय ८ फूट इतकी मोठी क्विल्ट तयार करून त्यांनी सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. शिवराज्याभिषेकाची कलाकृती भारतात प्रसिद्ध आहे. तिला जागतिक पातळीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे, असे दांडेकर यांनी सांगितले. आता ही क्विल्ट २५ ते २७ जानेवारीस चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

आभाळमाया फौंडेशनच्यावतीने येथील रोटरी क्लब हॉल, गणेशनगर येथे शिवराज्याभिषेक या क्विल्टचे सादरीकरण करण्यात आले. कलाशिक्षिका भारती क्षीरसागर यांच्याहस्ते क्विल्टचे अनावरण करण्यात आले. आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, भारती विद्यापीठाचे डॉ. नितीन नायक, तानाजीराव मोरे, रोहित दांडेकर, आदि दांडेकर, अरुण दांडेकर, डॉ. जया कुºहेकर, सुमेध शहा आदी उपस्थित होते.

क्विल्ट म्हणजे आजीबार्इंच्या गोधडीचे आधुनिक रुपडे. भारतात अगदी पूर्वापार चालत आलेल्या, पण हळूहळू कालबाह्य होत चाललेल्या या कलेला गेल्या काही वर्षांत नवजीवन मिळाले आहे. अधिकाधिक स्त्रियांनी ही कला शिकावी, याकरिता श्रुती या विविध ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेतात. 

शिवराज्याभिषेकाची कलाकृती ही कलाक्षेत्रातील एक मानदंड आहे. अनेक प्रकारात ही कलाकृती आपल्यासमोर आली आहे. क्विल्ट स्वरुपात ही कलाकृती तयार करण्याचा विचार बºयाच वर्षांपासून मनात होता. दहा महिन्यापूर्वी हे काम हाती घेतले. शिवरायांची महती महाराष्ट्रासह देशाला माहीत आहे. ही महती आपल्या कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर जावी, अशी इच्छा होती. आता ही इच्छा पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.- श्रुती दांडेकर, डिझायनर 

टॅग्स :SangliसांगलीShivrajyabhishekशिवराज्याभिषेक