शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहांत विनापरवाना ‘प्रयोग’ सुरूच

By admin | Updated: February 7, 2015 00:16 IST

सांगली-मिरजेच्या जिवाशी खेळ : जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

सांगली : सांगली-मिरजेतील नाट्यगृहांना प्रिमायसेसचा परवाना नसतानाही दीनानाथ, विष्णुदास भावे व बालगंधर्व नाट्यगृहात बिनधास्त कार्यक्रमांचे प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवारी) कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या नाट्यगृहांचे चार ते पाच वर्षापासून परवान्याचे नूतनीकरण न करता नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले.नाट्यगृहांना प्रत्येकवर्षी प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. या परवान्यासाठी अर्ज करताना त्यांना आरोग्य विभाग, फायर आॅडीट, सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाहरकत परवाना जोडावा लागतो. या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वर्षासाठी नाट्यगृहांना प्रिमायसेसचा परवाना देण्यात येतो. त्यानंतर प्रत्येक प्रयोगाला पोलिसांचा परवाना घेऊन त्यांना कार्यक्रम घेण्यास मान्यता मिळते. असे असताना सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह व मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिराकडे प्रिमायसेसचा परवाना नाही.
विशेष म्हणजे भावे नाट्यमंदिरने डिसेंबर २००८ पासून म्हणजे गेल्या सात वर्षात परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाकडे तीन वर्षापासून म्हणजे डिसेंबर २०१२ पासून परवान्याचे नूतनीकरण नाही, तर ‘बालगंधर्व’ कडेही वर्षापासून नूतनीकरण नाही. परवान्याचे नूतनीकरण नसतानाही या तिन्ही नाट्यगृहांत आठवड्यातून किमान तीन-चार प्रयोग होत आहेत. यामध्ये लावणी, नाटक, आॅर्केस्ट्रा यासह शालेय मुलांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांचाही समावेश आहे.
आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन दल आदी विभागांचे नाहरकत परवाने घेऊन, केवळ चारशे रुपयांच्या शुल्कावर हे परवाने मिळत असतानाही याकडे नाट्यगृहांनी दुर्लक्ष करून बिनाधास्त प्रयोग सुरू ठेवले आहेत. प्रयोग सुरू असताना कारवाईच्या बडग्यातूनही स्वत:ची सुटका करवून घेतली आहे. (प्रतिनिधी)

आठवडाभरात परवाना घेऊ
बालगंधर्व नाट्यगृहाचे लिपिक गेल्या महिन्याभरापासून रजेवर असल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही. येत्या आठवडाभरात परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सुनील नाईक यांनी दिली. काही कारणांमुळे नूतनीकरण झालेले नाही, मात्र लवकरात लवकर परवाने घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.


गेल्या आठ दिवसात नाट्यगृहात झालेले प्रयोग
बालगंधर्व मिरज - मराठी पाऊल पडते पुढे, जादूगार विश्वसम्राट
भावे नाट्यमंदिर - ढॅण्टॅढॅण, लग्नबंबाळ
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह - रंग खेळू चला, जलवा (लावणी महोत्सव), बेस्ट फाईव्ह (लावणी)


ज्या नाट्यगृहांनी अद्याप परवान्याचे नूतनीकरण करून घेतले नाही, मात्र व्यावसायिक प्रयोग चालू केले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तिकीट लावून प्रयोग आता त्यांना करता येणार नाही. याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार नाट्यगृह चालकावर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जातील.
- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.


रसिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे हे नाट्यगृह चालकाचे कर्तव्य नव्हे, कामच आहे. त्यासाठीच ते पैसे घेतात. रसिकांनाच नव्हे, तर त्याठिकाणी कला सादर करण्यासाठी आलेल्या कलाकारांनाही सुविधा दिल्या पाहिजेत. शॉर्टसर्किटने आग लागून नुकसान झाले होते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुविधा देऊन रितसर परवानगी घेतली पाहिजे.
- शफी नायकवडी, रंगकर्मी, सांगली

भावे नाट्यमंदिराचे नूतनीकरण
विष्णुदास भावे नाट्यमंदिराचे ४ फेब्रुवारीपासून नूतनीकरण सुरू आहे. यासाठी आगामी दोन महिने नाट्यगृह बंद असणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी दिली. विविध विभागांच्या सूचनेनुसार नाट्यगृहात बदल करण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन नाट्यगृहाच्या परवान्याचे नूतनीकरण करुन घेण्यात येईल.+