शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’चे विनापरवाना गाळप

By admin | Updated: January 13, 2016 23:26 IST

साखर आयुक्तांकडून दुर्लक्ष : साडेतीन लाख टन गाळपाची नोंद

सांगली : ‘एफआरपी’ची रक्कम दिली नसल्याने साखर आयुक्तांनी रोखलेल्या गाळप परवान्याकडे दुर्लक्ष करून येथील वसंतदादा साखर कारखान्याने गाळपाचा धुमधडाका लावला आहे. आतापर्यंत कारखान्याने तीन लाख ५७ हजार ६२० टन उसाचे गाळप करून तीन लाख ६१ हजार २३० क्ंिवटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नियमबाह्य हंगाम सुरू असूनही साखर आयुक्तांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली नसल्याने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास गाळप परवाना देऊ नये, असा अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी २४ नोव्हेंबररोजी साखर संचालकांकडे पाठवला. त्यानुसार आयुक्तांनी अद्याप कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही. मात्र गाळप परवान्याची वाट न पाहता, वसंतदादा कारखान्याने दि. २१ आॅक्टोबररोजी जिल्ह्यात सर्वात प्रथम गळीत हंगामाचा बार उडवला. हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्याने सर्व नियमांची पूर्तता करून परवाना घेणे बंधनकारक आहे. औद्योगिक क्षेत्रातील अन्य कारखान्यांनाही तोच नियम आहे. छोट्या उद्योजकाने हा नियम धाब्यावर बसवून उत्पादन घेतल्यास, शासकीय यंत्रणा तत्परता दाखवून त्याचे काम बंद पाडते. शिवाय नियमबाह्य उत्पादन घेतल्याप्रकरणी दंडही ठोठावला जातो. यंदा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नसल्याने त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तेथेही शासनाने तत्परता दाखविली आहे. मात्र वसंतदादा कारखान्याने गाळप परवानाच घेतलेला नाही, तरीही गाळप धुमधडाक्यात सुरू असल्याची नोंद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या दफ्तरी आहे. मात्र या कारखान्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी) दंड किती? : साडेतीन की पावणेअठरा कोटी राज्य शासनाच्या नवीन सहकारी कायद्यानुसार नियमबाह्य गळीत हंगाम घेतल्यास संबंधित कारखान्याकडून उसाला प्रतिटन ५०० रुपये दंड आकारणी होणार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. वसंतदादा कारखान्याचे दि. ४ जानेवारीपर्यंत तीन लाख ५७ हजार ६२० टन उसाचे गाळप झाले आहे. प्रतिटन ५०० रुपये दंड धरल्यास कारखान्यास १७ कोटी ८८ लाख रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. मात्र जुन्या कायद्यानुसार कारवाई करायची झाल्यास प्रतिटन शंभर रुपये दंड होऊ शकेल. त्यामुळे कारखान्यास तीन कोटी ५७ लाख रुपये दंड भरावा लागेल, असे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. आयुक्त कार्यालयास प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ आणि २०१४-१५ वर्षात गाळपासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. एफआरपीनुसार बिले दिली नसल्यामुळे कारखान्यास गाळप परवाना देऊ नये, असे आम्ही साखर आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाकडून कोणती कारवाई झाली, याबद्दल आम्हाला कल्पना नाही, अशी माहिती कोल्हापूरचे प्रादेशिक साखर संचालक राहुल रावळ यांनी दिली.