शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिराळा, वाळवा तालुक्याला गारांसह वादळी पावसाने झोडपले

By अशोक डोंबाळे | Updated: May 10, 2024 17:19 IST

सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथे आज, शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एक तास पडलेल्या ...

सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथे आज, शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एक तास पडलेल्या पावसाने रस्ते अगदी गारांनी पांढरेशुभ्र झाले होते. ऐतवडे बुद्रुक, कार्वे, चिकुर्डे व परिसरात दमदार पाऊस झाला. तसेच येळापूर (ता. शिराळा) येथेही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी ढगाळ हवामान होते.गेले दोन महिने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पाण्याविना ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली होती. या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मशागतीसाठी अशा पावसाची शेतकऱ्यांना गरज होती. कित्येक दिवसापासून शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.आज, शुक्रवारी दुपारी वाळवा तालुक्यातील कुरळप, ऐतवडे बु्द्रुक, कार्वे, चिकुर्डे परिसरात वादळी वारे, गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले होते. येळापूर परिसरात उन्हाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस