शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

असंघटित कामगार, कष्टकरी चळवळीचा कणा मोडला : चंदनासम झिजलेले नेतृत्व बिराज साळुंखे नावाचे आंदोलनातील वादळ झाले शांत; विविध संघटनांचा आधारवड कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:06 IST

बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला.

अशोक डोंबाळे ।सांगली : बालपणापासूनच गरिबी, दारिद्र्याशी संघर्ष करीत बिराज साळुंखे यांनी कार्वे ते मुंबई आणि पुन्हा सांगलीमध्ये कामगार, कष्टकरी, दलितांच्या अन्यायाविरोधात लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा लढा चालूच होता. गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कष्टकरी, कामगारांना आपण कुठे तरी पोरके झाल्याची जाणीव झाली. अनेकांनी कष्टकरी चळवळीचा आवाजच आज शांत झाला, अशीच भावना व्यक्त केली.

कार्वे (ता. खानापूर) या कायमस्वरुपी दुष्काळी गावात १५ जुलै १९३८ रोजी साथी बिराज साळुंखे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर दोन ते तीन वर्षांनंतर त्यांचे पितृछत्र हरपले. आईच्या पदरी लहान मुले. त्यात भरीस भर सलग चार वर्षे पावसाने दडी मारली होती. पोटासाठी आईने बिराज यांच्यासह मुलांना घेऊन थेट मुंबई गाठली. लालबाग-परळ येथील एका मिलमध्ये वार्इंडर म्हणून आईला नोकरी मिळाली. काही दिवसात मिलच बंद पडल्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. यावेळी निघालेल्या गिरणी कामगारांच्या मोर्चात आईबरोबरच स्वत: बिराजही सहभागी झाले होते.

बालपणापासूनच कामगार चळवळीचे धडे त्यांना मिळत गेले. लालबाग-परळ या कामगार वस्तीतच ते लहानाचे मोठे झाले. कष्टकऱ्यांचे जीवन काय असते, हे त्यांनी जवळून अनुभवले होते. मुंबईतील एम. आर. भट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिध्दार्थ कॉलेजमध्ये झाले. १९५६ मध्ये बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत बिराज साळुंखे सहभागी झाले होते. त्यांच्या मनावर समाजवादी विचारांचा मोठा प्रभाव होता. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा तर प्रचंड प्रभाव होता.

पुढे गांधीजींनी समाजसेवकांना खेड्यांकडे जाण्याचा संदेश दिला होता. तोच आदेश समजून कष्टकºयांच्या परिवर्तनाचे धडे ज्या मुंबईत गिरवले ती मुंबई सोडून १९६१ मध्ये बिराज साळुंखे पुन्हा कार्वे गावी आले. काँग्रेसच्या चिटणीस पदाची धुरा सांभाळत ग्रामीण भागात त्यांनी चळवळीचे काम चालू केले. चळवळ आणि काँग्रेस पक्ष यांचे गणित कुठे जुळून येत नसल्याचे लक्षात येताच या पदाचा त्याग करुन कामगार, कष्टकरी चळवळीत सक्रिय झाले.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा असो अथवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, यामध्ये ते सक्रिय सहभागी होते. शेतकरी, शेतमजुरांचे संघटन करण्यासाठी मस्टर असिस्टंट व मेस्त्री संघटना स्थापन केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अत्यंत चिकाटीने लढून १९९५ मध्ये राज्यातील सहा हजार हजेरी सहायकांना सरकारी नोकरीत घेण्यास सरकारला भाग पाडले. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका संघटनेची स्थापना करुन सरकारकडे रेटा लावून सेविकांना भरीव मानधन वाढवून घेतले. १९७०-७२ मध्ये नागज (ता. कवठेमहांकाळ) आणि मिरज तालुक्यात एक अशा दोन पाणी परिषदा घेऊन सरकारचे लक्ष वेधले होते.कार्यालयात ठाण...सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कामगारांचे प्रश्न सोडविण्यात ते व्यस्त होते. ते जेवणाचा डबाही घरातूनच घेऊन यायचे. नेहमीच त्यांच्या कार्यालयात गर्दी होती. कर्मचाºयांची गर्दी हेच त्यांच्या जगण्याचे खरेखुरे टॉनिक होते. कधीही ते कंटाळले नाहीत. त्यांनी कामगारांकडून कधीही एका रुपयाचीही अपेक्षा ठेवली नव्हती. कामगार संघटनेकडून मिळणाºया तुटपुंज्या मानधनावरच त्यांनी काटकसरीने संसाराचा गाडा चालविला होता. वयाच्या ८० व्या वर्षातही ते दुचाकीवरुनच सांगलीत फिरत होते.दिग्गज नेत्यांचा लाभला सहवाससाथी एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, भाऊ फाटक आदींनी स्थापन केलेल्या एस. टी. मजदूर सभेत १९७० मध्ये बिराज साळुंखे सक्रिय होऊन कार्यरत राहिले. लगेच पुढे डिसेंबर १९७० मध्ये एस. टी. महामंडळाचा स्वतंत्र सांगली विभाग झाला. यावेळी बिराज साळुंखे यांच्यावर एस. टी. मजदूर सभेच्या सांगली विभागाची जबाबदारी पडली. ही जबाबदारी त्यांनी गेल्या ४८ वर्षांत अखंडीत सांभाळली.

 

तुरुंगवासही भोगला२५ जून १९७५ च्या आणीबाणीची झळ बिराज साळुंखे यांनाही सोसावी लागली होती. एस. टी. कामगारांच्या संपाची नोटीस दिली म्हणून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू