शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

सांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळ, संकल्पना पुस्तक पेटीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:03 IST

आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी ह्यवाचन कट्टाह्ण उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्या सांगली-मिरजेतील विविध भागांमध्ये शनिवार-रविवारी आठ ते दहा वाचन कट्टे सुरू आहेत. त्यांना संवाद समुपदेशन केंद्राच्या अर्चना मुळे यांची साथ मिळतेय.

ठळक मुद्देसांगली-मिरजेमध्ये रूजतेय अनोखी वाचन चळवळसंकल्पना पुस्तक पेटीची, वाचन कट्टा उपक्रम

दत्तात्रय शिंदे सांगली : आजकाल मुले वाचत नाहीत, अशी तक्रार नेहमीच पालक करतात. या समस्येचे उत्तर शोधत एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सजग पालकांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी वाचन कट्टा उपक्रम सुरू केलाय. जिथे मूल-तिथे पुस्तक ही संकल्पना घेऊन सध्या सांगली-मिरजेतील विविध भागांमध्ये शनिवार-रविवारी आठ ते दहा वाचन कट्टे सुरू आहेत. त्यांना संवाद समुपदेशन केंद्राच्या अर्चना मुळे यांची साथ मिळतेय.सांगलीतील संवाद समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी एका व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या पालकांमध्ये मुले मोबाईल-टीव्हीमध्ये गुरफटलेली मुले वाचन करीत नसल्याचा सूर उमटला. या चर्चेतून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनकट्टे सुरू करण्याचा पर्याय समोर आला. त्यासाठी पुस्तके मिळवायची कुठून, असा प्रश्न होता. पण सांगलीतच ह्यवाचनप्रेमीह्ण नावाने लहान मुलांसाठीच वाचनालय चालविणाऱ्या विजया हिरेमठ यांनी साथ देत विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.यानंतर वर्षभरापूर्वी राम मंदिर परिसरातील ज्ञानेश्वर मंदिरात पहिला वाचन कट्टा भरला. मुलांचा प्रतिसादही चांगला मिळू लागला. हे पाहून ग्रुपमधील इतर पालकांनीही आपल्या भागात वाचन कट्टा सुरू करण्याची तयारी दर्शविली. यासाठी हिरेमठ यांच्या सहकार्याने पुस्तक पेटीची संकल्पना पुढे आली.

एका पेटीमध्ये पन्नास पुस्तके, अशा पुस्तक पेट्या प्रत्येक वाचन कट्ट्यावर देण्यात आल्या. सध्या सुनंदा कदम, श्वेता चितळे, सपना लड्डा, स्वाती कानेटकर, शर्वरी ताथवडेकर, मेघना गोखले, वृषाली भांबुरे, दीपाली रामचंद्रे, मानसी गोखले यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर मंदिर, शामरावनगर, आकाशवाणीजवळ सुभाषनगर, गुलमोहर कॉलनी, विश्रामबागमध्ये सावरकर कॉलनी, मिरजेत व्यंकोबा मंदिर, वारणाली, व्यंकटेशनगर, हरभट रोड, गावभाग येथे वाचन कट्टे सुरू आहेत.कट्ट्यावर येणारी बालवाडीतील मुले, ज्यांना वाचता येत नाही, अशांना गोष्ट वाचून दाखविली जाते. ज्यांना वाचता येते त्यांच्याकडून नियमित वाचन करून घेतले जाते. एखादी गोष्ट अर्धवट सांगून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत ती पूर्ण करण्यास सांगितली जाते.अशा विविध संकल्पनांमधून मुलांना वाचनाची गोडी लागतेय. कट्ट्यावर वीस-पंचवीस मुले नियमितपणे येत आहेत. पालकही त्यांना साथ देत घरीही मुलांकडून वाचन करून घेतात. वाचनाचे रेकॉर्डिंग करून दर रविवारी ग्रुपवर पोस्ट करतात.

श्रुती ठाणेकर या मुलीने तर ह्यतोतोचानह्णची पाच-पाच मिनिटाची पारायणेच केली आहे. मुग्धा कोळेकर हिने रचलेली बालकांना वाचन कट्ट्यावर येण्यासाठी आवाहन करणारी कविताही सध्या सर्वच वाचन कट्ट्यांवर धुमाकूळ घालतेय. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मोबाईल-टीव्हीमधून बाहेर पडून त्यांचे भावविश्व समृध्द व्हावे, हा उद्देश या कट्ट्यांना मिळणाऱ्या प्रतिसादातून साध्य झाल्याचे दिसतेय.

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर