शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांगली दौऱ्यावर, माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 13:15 IST

मंत्री आठवले आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी केली.

सांगली : येथील माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत होत आहे. यामध्ये होत असलेली कामे अत्यंत उत्कृष्ट असून हे उद्यान नागरिक व लहान मुले यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मंत्री आठवले आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी केली.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, संजय कांबळे, संदेश भंडारे आदी उपस्थित होते. आठवले यांनी उद्यानाच्या कामांची माहिती घेतली. त्यांच्या फंडातून मदतीचे आश्वासन दिले.‍आमदार गाडगीळ, विवेक कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. नगरसेवक ठोकळे यांनी माता उद्यानाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.उद्यानासाठी सव्वासात कोटींचा खर्चमहापालिकेच्या ३२ हजार चौरस फुट खुल्या भूखंडावर उद्यान विकसीत करण्यात येत आहे. त्यासाठी ७ कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.  त्यामध्ये बाहेरील बाजूस व मध्यभागात २.७ मीटर रूंदीचे वॉकींग ट्रॅक, सुमारे १२ मीटर उंचीचा क्रांतीस्तंभ, महामानवांचे अर्धपुतळे तसेच ध्यान मंदीर, विहार हाऊस व खुला रंगमंच, स्वागत कमानी आदी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवले