शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

निराधार भावंडांना मिळतेय माणुसकीचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:06 PM

लिंगनूर : रामनगर (आरग, ता. मिरज) येथील मातृ-पितृ छत्र हरविलेल्या बहिण-भावंडांसाठी मायेचे आणि माणुसकीचे छत्र आता उभारले जाऊ लागले आहे. या भावंडांच्या व्यथेची कथा आणि शाळेतील मुलांच्या मदतीची अनोखी घटना ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आता समाजातील अन्य सामाजिक संस्था व व्यक्तिंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. 

ठळक मुद्देमायेचे छत्र हरविल्यानंतर अपंग बहिणीची जबाबदारी कोवळ्या सूरजवर ‘लोकमत’ने घटना मांडल्यानंतर संस्था,व्यक्तिंचा मदतीचा हात पुढे बीड, शिरगुप्पी येथील संस्थेची जबाबदारी घेण्याची तयारी आमदार सुरेश खाडे मदत करणारसामाजिक संस्था राहण्याची व इतर सोय करण्यात येणार 

लिंगनूर ,दि. 20 :: रामनगर (आरग, ता. मिरज) येथील मातृ-पितृ छत्र हरविलेल्या बहिण-भावंडांसाठी मायेचे आणि माणुसकीचे छत्र आता उभारले जाऊ लागले आहे. या भावंडांच्या व्यथेची कथा आणि शाळेतील मुलांच्या मदतीची अनोखी घटना ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आता समाजातील अन्य सामाजिक संस्था व व्यक्तिंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. 

रामनगर (आरग) येथील सूरज चंद्रकांत नाईक व पूजा नाईक या निराधार भावडांसाठी आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. परिसरातील नागरिकांची सूरज व त्याच्या मतिमंद बहिणीला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

निराधार मुलांसाठी काम करणाºया बीड व शिरगुप्पी येथील संस्थेने त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. तसेच मिरज पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, आरग येथील सामाजिक कार्यकर्ते सागर वडगावे, आरग ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव खटावे यांनी या मुलांना व त्यांच्या घरास भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार सुरेश खाडे यांनी देखील या भावंडांना आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

लिंगनूरपासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या रामनगर येथील खोराडी वस्तीवरील ही हृदयाला पाझर फुटेल अशी सत्य घटना. सूरज चंद्रकांत नाईक याचे आई, वडील मूळचे मिरज येथील वीटभट्टी परिसरात राहायला होते. प्रथम त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मुलांची आई मोलमजुरी करून या दोन मुलांचा सांभाळ करीत होती.

कालांतराने सूरजच्या आईला आजार जडला. त्यामुळे ती सतत आजारी असल्याने तिचे जगणे मुश्कील झाले. त्यामुळे ती मावशीकडे रामनगर येथील खोराडी वस्तीवर राहायला आली. पण आजार वाढतच गेल्याने व पैशाअभावी वेळेत उपचार न झाल्याने ती मृत झाली. त्यावेळी सूरज तिसरीत शिकत होता, तर त्याची मतिमंद व अपंग बहीण घरीच होती.        

आईच्या मृत्यूनंतर या दोन भावंडांचा सांभाळ आईची मावशी करत होती. पण मावशीला देखील कर्करोगाने गाठले आणि नियतीने चार वर्षांनंतर या भावंडांचे उरलेसुरले छत्रही हिरावून नेले. तिच्या मृत्यूवेळी अंत्यसंस्कारासाठी लागणाºया खर्चासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली. त्यावेळी लिंगनूरमधील काही नागरिकांनी तिच्या अंत्यविधीसाठी आर्थिक मदत केली. अशारितीने मावशीच्या मायेचे छत्रही हरविल्यानंतर अपंग बहिणीची जबाबदारी कोवळ्या लहान सूरजवर येऊन पडली. 

 सूरज व बहीण पूजा हे झोपडीत दोघेच राहत असल्याने त्यांना शासकीय मदत देऊन त्यांची राहण्याची व इतर सोय करण्यात येणार  असून,सामाजिक संस्थांनीही या दोघा भावडांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे.  जनाबाई पाटील,सभापती, मिरज पंचायत समिती