शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक संघटनेकडून स्मशानभूमीत स्वच्छता, येलूर येथे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:03 IST

येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे.

ठळक मुद्देवाहतूक संघटनेकडून स्मशानभूमीत स्वच्छता, येलूर येथे उपक्रमबाजारपेठेतही मोहिम; सामाजिक उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचेही सहकार्य

संजय येंगटे 

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे.गावातील टेंपो व गाड्या भाड्याने देणारे मालक-चालक हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दर बुधवारी गावातील मुख्य बाजारपेठ व स्मशानभूमीची स्वच्छता करीत आहेत. याकरिता ग्रामपंचायतीकडून त्यांना झाडू देण्यात आले आहेत. मुख्य बाजारपेठेत अनेक व्यावसायिक, दुकानदार, बँक, दूध संस्था, सहकारी सेवा सोसायटी असल्याने तेथे नेहमी लोकांची गर्दी असते.

याच ठिकाणी दर शनिवारी मोठा बाजार भरतो. त्यामुळे येथे कचरा पडलेला असतो. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होऊ नये, म्हणून दर शनिवारी रात्री ग्रामपंचायतीच्यावतीने बाजारपेठेची स्वच्छता केली जाते व बुधवारी वाहतूक संघटनेच्यावतीने याच ठिकाणची स्वच्छता केली जात आहे. तसेच स्मशानभूमीचीही स्वच्छता या संघटनेच्या माध्यमातून केली जाते.या त्यांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांतून स्वागत होत आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ एक सामाजिक उपक्रम म्हणून ते हे स्वच्छता अभियान राबवित आहेत. या उपक्रमात संदीप गायकवाड, संताजी थोरात, सागर गायकवाड, बाबासाहेब कुंभार, महेश पाटील, कपिल चव्हाण, जयदीप पाटील, तानाजी पाटील, सचिन आडके यांनी सहभाग घेतला आहे. शिवाजीनगर भागातील भैरवनाथ मंदिर परिसरात येथील नितीन पाटील हे स्वखर्चाने रस्त्यालगत व पडीक जागेत वाढलेल्या तणावर तणनाशक फवारतात.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली