शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील प्रकार : ऊस वाहतूक करणाऱ्या बैलाला मरणयातना, कसरतीनंतर वीस मिनिटे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:55 IST

वेळ सायंकाळी पाचची... वसंतदादा कारखान्याजवळील संपत चौकात एका बैलगाडीभोवती गर्दी जमलेली... नुकत्याच केलेल्या गतिरोधकावरील ग्रीडच्या (खडी) ढिगाऱ्यांवरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या बैलांचे पाय घसरत होते. अर्धा तास सुरू असलेल्या कसरतीनंतर वेदनांनी त्रस्त झालेल्या बैलांच्या डोळ्यांतून पाणी आले... पायाजवळ मातीचे ढीग तयार करून अखेर या बैलगाडीला मार्गस्थ करण्यात आले.

ठळक मुद्देगतिरोधकाजवळ अर्धा तास कसरती सुरू वेदनांनी त्रस्त बैलांच्या डोळ्यांतून आले पाणी बैलगाडी अडकल्यामुळे सुमारे २0 मिनिटे वाहतुकीची कोंडी

सांगली : वेळ सायंकाळी पाचची... वसंतदादा कारखान्याजवळील संपत चौकात एका बैलगाडीभोवती गर्दी जमलेली... नुकत्याच केलेल्या गतिरोधकावरील ग्रीडच्या (खडी) ढिगाऱ्यांवरून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या बैलांचे पाय घसरत होते. अर्धा तास सुरू असलेल्या कसरतीनंतर वेदनांनी त्रस्त झालेल्या बैलांच्या डोळ्यांतून पाणी आले... पायाजवळ मातीचे ढीग तयार करून अखेर या बैलगाडीला मार्गस्थ करण्यात आले.सांगलीच्या अनेक रस्त्यांवर सध्या दगडी ग्रीड पसरली आहे. किरकोळ व गंभीर अपघात घडवित या ग्रीडने रक्ताचा खेळ सध्या चालविला आहे. माणसाला त्रासदायक ठरणाऱ्या या ग्रीडने आता मुक्या जनावरांनाही छळण्यास सुरुवात केली आहे. वसंतदादा कारखान्याकडे ऊस वाहतूक घेऊन जाणारी एक बैलगाडी गतिरोधकाजवळ अडकली.

एक तर प्रमाणापेक्षा जास्त भरलेली उसाची गाडी आणि त्यात रस्त्यावरील ग्रीडमुळे बैलाला मरणयातना सोसाव्या लागल्या. बैलाचे पाय घसरून तो वाकण्याच्या स्थितीत आल्याने संपत चौकातील काही नागरिकांनी हे वाहन तिथेच थांबविले. बैलाला थोडी विश्रांती घेण्यास वेळ दिला. पाच ते सहा नागरिकांनी परिसरातील माती हाताने उचलून बैलाच्या पायाखाली टाकली. कित्येक किलोमीटरचा प्रवास करून थकलेल्या बैलांच्या डोळ्यात तोपर्यंत अश्रू वाहू लागले.हे दृश्य पाहून अनेकांचे मन हेलावत होते. दररोज या मार्गावरून अशा अनेक बैलगाड्या जात असतात. कधीही असा प्रसंग निर्माण झाला नव्हता. मात्र दोनच दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकाने बैलांचा छळ मांडला आहे.

पेव्हिंग ब्लॉकचे हे गतिरोधक बसवून त्याच्याभोवती डांबर आणि ग्रीड ओतण्यात आली आहे. त्यामुळे हा गतिरोधक सोयीपेक्षा अधिक धोकादायकच बनला आहे. वाहनेही घसरत आहेत. त्यामुळे बैलांचा दररोजचा कारखान्याकडील प्रवासही खडतर बनला आहे. एक, दोन नव्हे, तर अशाप्रकारचे चार-चार गतिरोधक या मार्गावर केले आहेत. त्यामुळे या बैलगाडीला जुंपलेल्या बैलांचे हाल माणसांपेक्षाही वाईट झाले आहेत.वाहने थांबली...बैलगाडी अडकल्यामुळे सुमारे २0 मिनिटे वाहतुकीची कोंडी झाली होती. तरीही बैलांचे हाल पाहून वाहनधारकांनीही संयम बाळगल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीBull Cart Raceबैलगाडी शर्यत