शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील दोन तरुण कृष्णा नदीपात्रात बेपत्ता, गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:36 IST

सांगली : येथील वाल्मीक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय ...

सांगली : येथील वाल्मीक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय १८) हे दोघे युवक सरकारी घाटाजवळ बुडाले. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघे जण भोवऱ्यात अडकून बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेनंतर रेस्क्यू टीम आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंधारानंतर शोध मोहीम थांबवली.शिवाजी मंडईसमोरील वाल्मीक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाची गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते. गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर सायंकाळी ५ वाजता आले होते. धरणातून पाणी साेडल्यामुळे पातळी वाढली असून, पाण्याला धार होती.मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघे जण पाण्यात बुडू लागले. तेव्हा एका मच्छीमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले. दोघांना पात्राबाहेर येता आले नाही. दोघे जण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणे