शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृष्णा नदीत दोघे युवक बुडाले; गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना

By घनशाम नवाथे | Updated: September 5, 2024 20:48 IST

अंधारानंतर शोध मोहिम थांबवली.

घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : येथील शिवाजी मंडईजवळील वाल्मिक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय १८) हे दोघे युवक सांगलीत सरकारी घाटाजवळ बुडाले. गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. दोघेजण भोवऱ्यात अडकून बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेनंतर रेस्क्यू टीम आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंधारानंतर शोध मोहिम थांबवली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवाजी मंडईसमोरील वाल्मिक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाची गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते. गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर सायंकाळी पाच वाजता आले होते. तेव्हा जवळपास चार फुटाची मूर्ती घेऊन सहाजण नदीपात्रात उतरले. धरणातून पाणी साेडल्यामुळे पातळी वाढली असून पाण्याला धार होती.मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघेजण पाण्यात बुडू लागले. तेव्हा एका मच्छिमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले. दोघांना पात्राबाहेर येता आले नाही. दोघेजण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले. काठावर असलेल्या तरूणांनी मदतीसाठी आरडाओरड केला. परंतू क्षणार्धात दोघे पाण्यात बुडून दिसेनासे झाले.

दोघे युवक बुडाल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन, विश्वसेवा बोट क्लब यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू काही वेळातच अंधार पडला. तसेच पाण्याला धार असल्यामुळे शोध कार्यात अडथळे येत होते. शहर पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनीही घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

दोघेही गरीब कुटुंबातील

आदित्य व अक्षय नदीत बुडाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. दोघे गरीब कुटुंबातील आहेत. आदित्य हा कॉलेजला जातो. आई आणि भाऊ, बहिण असे तिघेजण आहेत. तर अक्षय देखील खासगी नोकरी करतो. त्यालाही वडील नसून आई-बहिणीसह तो राहत होता.

घाटावर अंधाराचे साम्राज्य

गतवर्षीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर मंडळाचे कार्यकर्ते येत आहेत. परंतू घाटावरील पथदिवे बंद असून सर्वत्र अंधार आहे. अंधारामुळे शोध मोहिम खंडीत करावी लागली.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Visarjanगणेश विसर्जन