सांगली : शहरातील पोस्टाजवळ असलेल्या गणेश मार्केट परिसरातून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी दीपक अशोक जामदार (रा. सुभाषनगर ता. मिरज) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
-----------
मोबाइल लंपास
सांगली : शहरातील माधव नगर जकात नाक्याजवळ मोटार सायकलवर मोबाइल ठेवलेला चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी अनिल मोहन खरमाटे (रा. संजयनगर,सांगली) यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली आहे. खरमाटे हे दुचाकी हॅण्डलवर मोबाइल ठेवून लघूशंकेसाठी गेले होते. यावेळेत चोरट्यांनी मोबाइल पळविला. शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
----
कारच्या धडकेत एक जण जखमी
सांगली : कवलापूर येथील नाईक गल्लीजवळ भरधाव कारने समोरुन धडक दिल्याने एक जण जखमी झाला. याप्रकरणी विष्णू हंबीरराव पाटील (रा. कुमठे ता. तासगाव) यांनी मदगोंडा मालानावर (रा. उमदी ता. जत) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात पाटील यांच्या मांडीला दुखापत झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.