शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अतिक्रमण काढताना सहायक आयुक्तांना धक्काबुक्की; दोन विक्रेत्यांना वर्षाची साधी कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:56 IST

‘तू कोण सांगणार, तुला बघून घेतो’ असे धमकावत हातगाडा अंगावर ढकलला

सांगली : मिरजेत अतिक्रमण काढताना तत्कालीन सहायक आयुक्त संभाजी मेथे यांना धक्काबुक्की करून धमकी देणाऱ्या आरोपी कैस सलीम शेख (वय ३०), रमिज रियाज मुल्ला (वय २७, दोघे रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) यांना एक वर्ष साधी कैद व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी हा निकाल दिला.मिरज शहरातील युनिक प्लाझासमोर, सिव्हिल हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक या रस्त्यावर कैस सलीम शेख, रमिज रियाज मुल्ला यांचा मांसाहारी खाद्यपदार्थाचा गाडा बेकायदा उभा केला होता. सहा वर्षांपूर्वी दि. ३१ जानेवारी २०१९ रोजी महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त मेथे व त्यांचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. अतिक्रमण काढताना आरोपी कैस व रमिज या दोघांनी सहायक आयुक्त मेथे व कर्मचाऱ्यांना अडवून धक्काबुक्की केली. मेथे यांना ‘तू कोण सांगणार, तुला बघून घेतो’ असे धमकावत हातगाडा अंगावर ढकलला. या प्रकरणी मेथे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती. मिरज शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार शशिकांत पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, अतिरिक्त सरकारी वकील आर. सी. नरवाडकर व सौ. यु. बी. करवते यांनी काम पाहिले. एकूण सात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. साक्षीदारांच्या पुराव्यावरून न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.