इस्लामपुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:13+5:302021-02-26T04:40:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील इंदिरा कॉलनी परिसरातील राधा मारुती बाळेकुंद्री (वय ५) आणि गौरव तेजस गुजले (९) ...

Two stray dogs attack stray dog in Islampur | इस्लामपुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालकांवर हल्ला

इस्लामपुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन बालकांवर हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील इंदिरा कॉलनी परिसरातील राधा मारुती बाळेकुंद्री (वय ५) आणि गौरव तेजस गुजले (९) या दोन चिमुरड्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जबर जखमी केले. ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. नागरिकांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला असता ते नागरिकांच्या अंगावर धावून आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

इंदिरा कॉलनीतील सतीश पोरे यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी नातेवाईक आले होते. राधा बाळेकुंद्री ही त्यांची मुलगी आहे. सकाळी १०.३०च्या सुमारास राधा ही घरासमोर खेळत होती. पिसाळलेल्या कुत्र्याने मुलीच्या चेहऱ्याला चावा घेतला. मुलीच्या ओरडण्याने घरातील नागरिक रस्त्यावर येताच पिसाळलेला कुत्र्याने घराच्या पायरीवर बसलेल्या गौरव गुजले याच्या हाताचा चावा घेतला.

कॉलनीमध्ये पिसाळलेला कुत्रा आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. काही नागरिकांच्या अंगावरही तो चावा घेण्यासाठी धावून आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थोरात यांनी ही माहिती पालिका प्रशासनाकडे दिली असून पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Two stray dogs attack stray dog in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.