शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांची घरपट्टी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:44 IST

Crime Sangli : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका शिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देएरंडोलीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांची घरपट्टी वसुलीशिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट

सांगली : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका शिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडे नोंद नसलेल्या पावती पुस्तकांचा वापर शिपायाने केल्याची माहिती सरपंच वासंती धेंडे यांनी दिली. याद्वारे वसुल केलेली रक्कम सुमारे दोन लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. वसुली अपेक्षेहून कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर धेंडे यांनी सतत दोन महिने लक्ष ठेवले.

काही मालमत्ताधारकांशी चर्चा केली. त्यांनी घरपट्टी भरल्याचे सांगत पावत्याही दाखवल्या. धेंडे यांनी ग्रामपंचायतीत पडताळणी केली असता संबंधित मालमत्ताधारकांच्या नावे थकबाकी कायम असल्याचे दिसले, शिवाय त्यांनी दाखवलेल्या पावत्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्याचेही आढळले.चौकशीअंती शिपायाकडे नोंद नसलेली पावती पुस्तके सापडली. ती कोठून मिळवली याचा माग काढला जात आहे. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या काळात वसुलीसाठी पुस्तके वापरली गेली आहेत. त्यावर त्याच्या सह्यादेखील आहेत.

वसुल घरपट्टीचा भरणा ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात केलेला नाही. यामुळे सरपंचांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली. डुडी यांच्या सुचनेनुसार मिरज पंचायत समितीचे विस्ताराधिकारी सदाशिव मगदुम अधिक चौकशी करत आहेत. डुडी म्हमाले की, अनधिकृत पावत्यांद्वारे घरपट्टी वसुली ही गंभीर बाब आहे. याची सखोल चौकशी करु. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सरपंच धेंडे म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या पैशांचा अपहार धक्कादायक आहे. यापूर्वीच्या वसुलीच्या ऑडिटचीही मागणी करणार आहोत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली